विराट कोहली नव्हे तर 'हा' आहे आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१ला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, चेन्नई, बंगळुरू हे संघा गुणतक्त्यात आघाडीवर आहेत. आयपीएलमधून बीसीसीआयला २५०० कोटींचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे खेळाडूही अधिक मालामाल होत आहेत. पण, आयपीएल इतिहासात सर्वाधिक सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली हे नाव अव्वल स्थानी नाही.

एबी डिव्हिलियर्स - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या या खेळाडूनं २००८ ते २०२१ या कालावधीत आयपीएलमधून १०२ कोटी ५१ लाख ६५ हजार कमावले आहेत. २०२१मधील त्याचा पगार हा ११ कोटी इतका आहे.

सुरेश रैना - चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा खेळाडू सुरेश रैना यानं आतापर्यंत ११० कोटी ७४ लाख रुपये कमावले आहेत आणि २०२१च्या आयपीएलमधील त्याचा पगार हा ११ कोटी आहे.

विराट कोहली - RCBचा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं आतापर्यंत १४३ कोटी २० लाख कमावले आहेत आणि २०२१मध्ये सर्वाधिक १७ कोटी इतका पगार तो घेणार आहे.

रोहित शर्मा - मुंबई इंडियन्सला चार जेतेपद जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा १४६ कोटी ६० लाखांच्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२१त त्याचा पगार हा १५ कोटी इतका आहे.

महेंद्रसिंग धोनी - चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी हा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. त्यानं आयपीएलमधून आतापर्यंत १५२ कोटी ८४ लाख कमावले आहेत आणि आयपीएलमध्ये १५० कोटींच्या वर कमाई करणारा तो एकमेव खेळाडू आहे. यंदाच्या पर्वात तो १५ कोटी पगार घेणार आहे.