बेहेन, छोटू भैयानंतर Rishabh Pant ने बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला पुन्हा डिवचले; म्हणाला...

Rishabh Pant vs Urvashi Rautela : भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातली तू तू मै मै! काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीए...

उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत RP असा उल्लेख करून तो क्रिकेटपटू तिला भेटण्याठी १० तास थांबला होता असा दावा केल्या. त्या RP चा अर्थ हा सर्वांनी रिषभ पंत लावला, कारण रिषभ व उर्वशी यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर रिषभकडून मेरा पिछा छोड दो बेहेन असे प्रत्युत्तर आले आणि त्याला अभिनेत्रीने छोटू भैया असे उत्तर दिले. आता रिषभने आणखी एक इस्टा पोस्ट टाकलीय आणि ती उर्वशीसाठीच असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अभिनेत्रीला भेटण्यासाठी रिषभला १६ तास प्रतीक्षा करावी लागली होती आणि त्यानंतर रिषभ-उर्वशीच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. पण, रिषभने २०२०मध्ये प्रेयसी इशा नेगीसोबतचा फोटो पोस्ट करून या चर्चांना पूर्णविराम लावला. उर्वशीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात एका मुलाखतीत तिने रिषभसोबतच्या त्या भेटीवर स्पष्ट मत मांडले आहे.

उर्वशीने सांगितले की,''मी वाराणसीहून शूटींग संपवून दुसऱ्या प्रोजेक्टसाठी दिल्लीत दाखल झाली. वेळापत्रक एवढं व्यग्र होतं की मला कोणाला भेटण्याचीही वेळ नव्हती. दिल्लीत शुटींग करून झाल्यानंतर मी एवढी थकली होती की १० तास झोपून राहिले. त्या दरम्यान ६०-७० मिस्ड् कॉल माझ्या मोबाईलवर येऊन गेले होते. उठल्यावर ते मी पाहिले. ती व्यक्ती ( तिने रिषभचं नाव नाही घेतलं) मला भेटण्यासाठी वाट पाहत होती आणि त्यानंतर मी त्याला भेटले. मीडियाने ही गोष्ट एवढी रंगवली की...''

त्यानंतर रिषभने पोस्ट लिहिली की, तुरळक प्रसिद्धीसाठी काही लोकांना मुलाखतीत खोटं बोलताना पाहून, गंमत वाटतेय. त्यांना हेडलाईनमध्ये राहायचे आहे. लोकं प्रसिद्धीसाठी एवढे तहानलेले आहेत, हे पाहून दुःख होतंय. #merapichachorhBehen #Jhutkibhilimithotihai

उर्वशीने लिहिले की, 'छोटू भैया को बैट बॉल खेलना चाहिए. मैं कोई मुन्नी नहीं हूं डार्लिंग बच्चे तेरे लिए बदनाम होने को. रक्षा बंधन मुबारक हो. #RPChotuBhaiyya #Cougarhunter #donttakeadvantageofasilentgirl.'(Photo Instagram)

आता पंतने आणखी एक इंस्टा स्टोरी पोस्ट केलीय त्यात त्याने लिहिले की ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात त्याचा ताण घेऊ नका