T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: टीम इंडियाच्या लाजीरवाण्या पराभवाला 'ही' पाच कारणं ठरली जबाबदार!

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: पाकिस्तानच्या संघानं आजच्या लढतीत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व आघाडींवर आज पाकिस्तानचा संघ वरचढ ठरला. भारतीय संघाकडून आज विजयासाठी काहीच प्रयत्न झालेले दिसले नाही. भारताचे ७ बाद १५१ धावांचे आव्हान पाकिस्ताननं बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांच्या जोरावर १७.५ षटकांत सहज पार केले. पाकिस्ताननं हा सामना १० विकेट्स राखून जिंकला.

फलंदाजांचे अपयश - रोहित शर्मा, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव हे झटपट माघारी परतल्यानंतर विराट कोहली व रिषभ पंत यांनी डाव सावरला होता. या दोघांनी ५३ धावांची भागीदारी केली होती, परंतु ही जोडी तुटताच विराटला तळाच्या फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. रवींद्र जडेजा व हार्दिक पांड्या हेही अपयशी ठरले आणि भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

गोलंदाजांनीही केले निराश - मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व वरुण चक्रवर्थी हे गोलंदाज अपयशी ठरले. पाचपैकी एकालाही विकेट घेता आली नाही. शमीनं ११च्या सरासरीनं, भुवीनं ८, तर बुमराहनं ७च्या सरासरीनं धावा दिल्या. आर अश्विन संघात असतानाहा चक्रवर्थीला खेळवण्याचा डाव फसला.

सहाव्या गोलंदाजाची उणीव - हार्दिक पांड्याला गोलंदाजी करणे जमणार नाही, हे माहित असतानाही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले. त्यानं फलंदाजीत तर काही कमाल दाखवली नाहीच, शिवाय दुखापतग्रस्त होऊन तो माघारी परतलाय. भारताकडे शार्दूल ठाकूर व अश्विन असे दोन पर्याय होते.

प्लेइंग इलेव्हनमध्ये चूक - इशान किशन फॉर्मात असतानाही सूर्यकुमारची झालेली निवड, हार्दिक पांड्याला अनफिट असूनही मिळालेली संधी, यामुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे. त्यात अश्विन असताना वरुण चक्रवर्थीची निवड बुचकळ्यात टाकणारी ठरतेय.

नाणेफेकीचा कौल - नाणेफेक महत्त्वाची ठरली. विराट कोहलीलाही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायची होती, पण आज नशिबाची साथ बाबर आजमला मिळाली.

Read in English