Suresh Raina vs CSK Rashid Khan David Miller, IPL 2022: "आता कुठे IPLमध्ये जान आल्यासारखं वाटतंय"; CSKच्या पाचव्या पराभवानंतर सुरेश रैनाने केलं ट्वीट

चेन्नईच्या पराभवानंतर लगेचचे रैनाने ट्वीट केल्याने चर्चा

Suresh Raina vs CSK Rashid Khan David Miller, IPL 2022 CSK vs GT: गुजरात टायटन्स संघाने थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवला. ३ बाद १६ या धावसंख्येवर गुजरातचा संघ असताना डेव्हिड मिलरने नाबाद ९४ धावांची खेळी केली.

मिलर व्यतिरिक्त हंगामी कर्णधार राशिद खानने १८व्या षटकात २५ धावा कुटत संघाला विजयासमीप आणण्यास मदत केली. त्याने २० चेंडूत ४० धावांची उपयुक्त खेळी केली.

यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघाला सहापैकी पाचव्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. चेन्नईच्या या पराभवानंतर सुरेश रैनाने केलेले कौतुकाचे ट्वीट चांगलेच चर्चेत राहिले.

चेन्नईच्या संघाला IPL 2022 मध्ये पाचवा पराभव झाला. त्यामुळे ते गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानी फेकले गेले. या सामन्यानंतर सुरेश रैनाने ट्वीट करत भावना व्यक्त केल्या.

"व्वा! सामना खूपच अप्रतिम आणि धमाकेदार झाला. अशाप्रकारच्या रोमांचक सामन्यांमुळे आता कुठे आयपीएलमध्ये जान आली. आता IPL पुन्हा एकदा मजेदार वाटू लागले आहे", असे ट्वीटमध्ये त्याने लिहिले. तसेच, पुढेही त्याने मत मांडले.

रैना ट्वीटमध्ये म्हणाला, "राशिद खान तुझं विशेष कौतुक. कर्णधार म्हणून तुझा पहिलाच सामना असताना तू उत्तम कामगिरी करून दाखवलीस. आणि मिलर, तू तर CSKच्या गौलंदाजांचे चेंडू थेट मैदानातून बाहेरच मारलेस."