भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत तिचा विवाह होणार होता. पण आयत्यावेळी वेगळेच घडले.
ऐन लग्नाच्या दिवशी लग्न लांबवणीवर पडले. आधी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने निर्णय घेतल्याचे समजले. त्यानंतर मात्र पलाश मुच्छलबाबत काही नकारात्मक बातम्यांचा ओघ सुरु झाला.
पलाश मुच्छल याने स्मृतीची फसवणूक केल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात आला. तशातच स्मृतीनेही आपल्या लग्नासंबंधीचे सारे फोटो आणि व्हिडीओ हटवून टाकले.
अखेर दोन आठवड्यानंतर हे लग्न मोडले असल्याचे स्मृती आणि पलाश यांनी आपल्या सोशल मीडियातून जाहीर केले आणि त्यानंतर पलाश मुच्छलविरोधातील संतापाच्या लाटेला गतीच मिळाली.
स्मृतीने लग्न मोडल्याची घोषणा केल्यानंतर पलाशला लगेचच आपल्या इन्स्टाग्राम लिस्टमधून काढून टाकले आणि त्याची प्रोफाईल देखील अनफॉलो केली. याचे विविध अर्थ काढले जात आहेत.
पण महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ स्मृती मानधनाच नव्हे तर तब्बल आणखी ९ खास लोकांनीही पलाश मुच्छालला अनफॉलो केल्याची माहिती आहे. यामध्ये स्मृतीचे कुटुंबीय आणि क्रिकेट सहकारी आहेत.
स्मृतीचा भाऊ श्रवण मानधना यानेही पलाशला अनफॉलो केल्याचे सांगितले जात आहे. पलाश आणि श्रवण यांच्यात लग्नाच्या आदल्या रात्री वाद झाल्याचा दावा काहींनी केला, पण त्याची पुष्टी झालेली नाही.
याशिवाय स्मृतीची जवळची मैत्रिण जेमिमा रॉड्रीग्ज हिने पलाशला अनफॉलो केले आहे. स्मृतीच्या कठीण काळात जेमिमाने WBBL स्पर्धेला न जाण्याचा निर्णय घेत स्मृतीला आधार दिला.
तसेच स्मृतीच्या सहकारी श्रेयांका पाटील, राधा यादव, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, यास्तिका भाटिया, रिचा घोष आणि शिवाली शिंदे या सर्व महिला क्रिकेटपटूंनी पलाशला अनफॉलो केले आहे.