Shubman Gill Sachin Tendulkar, IPL 2022: शुबमन गिलचा धमाका; सचिनच्या १३ वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी; 'असा' पराक्रम करणारा केवळ दुसरा!

सचिनने २००९ साली दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या IPL मध्ये केला होता पराक्रम

Shubman Gill Sachin Tendulkar, IPL 2022: यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा गुजरात टायटन्सने बाजी मारली आणि प्लेऑफ्स फेरीत प्रवेश मिळवणारा पहिला संघ ठरण्याचा मान मिळवला.

गुजरात टायटन्सच्या या सामन्यात शुभमन गिलने शानदार खेळी केली. तो ६८ धावा करून नाबाद राहिला.

संपूर्ण हंगामात गुजरात संघाकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत शुबमन गिल अव्वलस्थानी आहे. त्यासोबतच शुबमन गिलने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या १३ वर्षांपूर्वीच्या पराक्रमाशी बरोबरी केली.

शुभमन गिलने मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ४९ चेंडूत ६३ धावा केल्या. या डावात त्याने ७ चौकार मारले आणि संपूर्ण २० षटके खेळून नाबाद राहिला.

IPLच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखाद्या खेळाडूने संपूर्ण २० षटके फलंदाजी केली, पण त्याने एकही षटकार मारला नाही. शुभमन गिलच्या आधी सचिन तेंडुलकरने ही कामगिरी केली होती.

सचिन तेंडुलकरने २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अशी कामगिरी केली होती. आता शुभमन गिलने २०२२ मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध या कामगिरीची पुनरावृत्ती केली.

दरम्यान, शुभमन गिलच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर या मोसमात आतापर्यंत त्याने १२ सामन्यात ३८४ धावा केल्या आहेत.

यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. गिलने IPL मध्ये आतापर्यंत ४० चौकार आणि ९ षटकार मारले आहेत.

यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. गिलने IPL मध्ये आतापर्यंत ४० चौकार आणि ९ षटकार मारले आहेत.