IND vs SA, 2nd ODI, Team India Probable XI : भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात दोन बदल करणार; ऋतुराज गायकवाड किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाची निवड होणार?

IND vs SA, 2nd ODI, Team India Probable XI : २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा विचार करता भारताकडे संघबांधणी करण्याची हीच संधी आहे आणि त्यामुळे त्यादृष्टीनं आतापासून पाऊलं उचलण्याची गरज आहे.

IND vs SA, 2nd ODI, Team India Probable XI : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात पराभव झाल्यानंतर मालिकेतील आव्हान टीकवण्याचे लक्ष्य टीम इंडियासमोर आहे. शुक्रवारी भारत-दक्षिण आफ्रिका ( India vs South Africa) यांच्यात दुसरा वन डे सामना खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यात मधल्या फळीला आलेल्या अपयशानं भारताला ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

२०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा विचार करता भारताकडे संघबांधणी करण्याची हीच संधी आहे आणि त्यामुळे त्यादृष्टीनं आतापासून पाऊलं उचलण्याची गरज आहे. त्यामुळे दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघात दोन बदल पाहायला मिळतील. भारतासाठी हा सामना करा अथवा मरा असाच आहे, त्यामुळे कोणतीही चूक महागात पडू शकते.

मालिका सुरू होण्याआधी लोकेश राहुलनं सलामीला खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश सलामीला खेळत असला तरी २०२३चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवल्यास रोहित व शिखर धवन हीच टीम इंडियाची पहिली पसंती असणार आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत ऋतुराज गायकवाडला सलामीला संधी देऊन लोकेश पुन्हा मधल्या फळीत खेळू शकतो.

तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असल्यानं श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी आहे आणि त्याला स्पर्धक म्हणून सूर्यकुमार यादव आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी या दोन खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळू शकते. पहिल्या वन डेत श्रेयसला अपयश आले. लोकेश पाचव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर आहे.

अष्टपैलू वेंकटेश अय्यरनं पहिल्या सामन्यातून पदार्पणे केले, परंतु त्याला गोलंदाजीच दिली नाही. त्यात फलंदाजीत त्यानं २ धावा केल्या. तेच शार्दूल ठाकूरनं फलंदाजीत नाबाद अर्धशतक झळकावून अष्टपैलू म्हणून स्वतःची जागा पक्की केली आहे.

आर अश्विननं चांगली गोलंदाजी केली. युजवेंद्र चहलनंही त्याला चांगली साथ दिली. पण, विकेट घेण्यात ते अपयशी ठरले. तरीही दुसऱ्या वन डेत ही दोघंही कायम दिसतील.

जलगती गोलंदाजीत जसप्रीत बुमराह कायम राहू शकतो. भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.

संभाव्य संघ - ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रिषभ पंत, शार्दूल ठाकूर, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार/मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह