Rahul Dravid House: स्वभाव, तसंच रहाणीमान!; राहुल द्रविडच्या आलीशान बंगल्याची सफर केल्यावर मनाला भावेल साधेपणा!

Rahul Dravid House: भारतीय संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविड हा अनेक युवकांचा आदर्श आहे.

Rahul Dravid House: भारतीय संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविड हा अनेक युवकांचा आदर्श आहे.. शांत, संयमी, संस्कारी असलेल्या राहुल द्रविडचे भारतीय क्रिकेटमधील योगदान हे अमुल्य आहे. संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला तेव्हा द्रविड उभा राहिला आणि म्हणूनच त्याला दी वॉल असे म्हटले जाते

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राहुल द्रविडनं भारतीय क्रिकेटसाठी योगदान देणे थांबवले नाही. १९ वर्षांखालील व भारत अ संघाचे प्रशिक्षकपद भूषवून त्यानं युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद सांभाळताना युवा पिढी घडवली. आज तो वरिष्ठ संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

राहुल द्रविडच्या नावावर कसोटीत १३,२८८, वन डेत १०,८८९ धावा आहेत. यष्टिरक्षक, कर्णधार, ओपनर आदी सर्व जबाबदाऱ्या द्रविडनं इमाने इतबारे पार पाडल्या. त्याच्यावर सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यानं न्याय दिला. राहुल जसा मैदानावर तसा मैदानाबाहेरही आहे.

त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे.

त्याचा शांत व संयमी स्वभाव अनेकांना आवडतो आणि द्रविडच्या रहाणीमानातूनही त्याच्या याच स्वभावाची प्रचिती येते.

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे राहुल द्रविड आपल्या कुटुंबासोबत राहतो. येथील इंदिरा नगर येथे त्याचा आलीशान बंगला आहे.

हा बंगला बाहेरून जेवढा सुंदर दिसतो, तेवढाच तो आतूनही मनाला भावणारा आहे. २०१४मध्ये त्यानं हा बंगला बांधला.