Ravi Shastri IPL 2022 : ४-५ सामने सीट गरम करत होता की काय?; रवी शास्त्री बिनधास्त बोलले, Mumbai Indiansच्या मॅचमध्ये हाणले टोमणे!

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) हे पुन्हा क्रिकेट समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहेत.

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) हे पुन्हा क्रिकेट समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहेत. भारतीय संघासोबत असल्यामुळे त्यांना मागील अनेक वर्ष कॉमेंट्री करताच आली नव्हती. पण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ते मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेतून मुक्त झाले आणि आता आयपीएल २०२२मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये परतले आहेत.

शास्त्री यांची कॉमेंट्री करण्याची वेगळीच शैली आहे आणि ती सर्वांना आवडतेही. आयपीएल २०२२मध्ये त्यांच्या अशाच एका बिनधास्त विधानाची चर्चा रंगली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या लढतीत त्यांनी केलेलं विधान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने त्या लढतीत विजय मिळवत प्ले ऑफमधील आव्हान कायम ठेवले आहे. पण, त्यांचं गणित हे इतरांच्या निकालावर अवलंबून आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने संघ निवडीत CEO ही सहभागी असतात असे वादग्रस्त विधान त्या सामन्यात केले होते. त्यात पॅट कमिन्सनला ( Pat Cummins) काही सामन्यांत न निवडण्यावरूनही फॅन्स नाराज होते.

ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख गोलंदाजाला KKR ने अंतिम ११मधून वगळले आणि त्याच्या जागी टीम साऊदीला खेळवणे पसंत केले. मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत कमिन्सचे पुनरागमन झाले आणि त्याने मॅच विनिंग कामगिरी करून दाखवली. कमिन्सने त्या सामन्यात २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या.

कमिन्सला न खेळवण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर रवी शास्त्री यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, नशीब आज तरी पॅट कमिन्सला खेळवले. माहीत नाही तो इतके दिवस काय करत होता. ४-५ सामने सीट गरम करत होता वाटतं. जगात नंबर वन गोलंदाज असलेला खेळाडू, वर्ल्ड कप विजेता, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अशा खेळाडूला बाकावर बसवून ठेवताय.''

कोलकाता नाईट रायडर्स - १२ सामने, १० गुण - उर्वरित लढती - सनरायझर्स हैदराबाद ( १४ मे) व लखनौ सुपर जायंट्स ( १८ मे); कोलकातालाही RCBच्या पराभवाची प्रतीक्षा आहे. हा संघ जास्तीतजास्त १४ गुण कमवू शकतो. पुढील गणित नेट रन रेट व अन्य संघांच्या कामगिरीवर आहे.