पांड्या ब्रदर्स झाले मुंबईकर; हार्दिक-कृणालने घेतला 8 BHK फ्लॅट, दिशा पटानी अन् टायगर श्रॉफ आहेत शेजारी!

भारतीय संघातील अष्टपैलू भावंडांची जोडी हार्दिक आणि कृणाल पांड्या हे मुंबईकर झाले आहेत. त्यांनी मुंबईत 8 BHK फ्लॅट खरेदी केला आहे.. त्याचं आलिशान घर पाहून डोळे विस्फारले जातील...

हार्दिक व कृणाल यांचं नातं घट्ट आहे आणि दोघही भाऊ मित्रांसारखेच राहतात. या दोघा भावंडांनी खारमध्ये हे नवीन घर खरेदी केलं आहे.

हार्दिक आणि कृणाल यांनी रुस्तमजी पॅरामाऊंट सोसायटीत हे घर खरेदी केलं आहे. हा फ्लॅट ३८३८ स्क्वेअर फुटांचा असून ४+४ असे आठ रुम आहेत. याची किंमत ३० कोटींच्या घरात आहे.

त्यांच्या घरातून समुद्रकिनारा दिसतो आणि त्याच्या या सोसायटीत जिम आणि प्रायव्हेट थिएटरही आहे. स्विमिंग पूल, इनडोअर गेमिंग झोन हेही आहे.

हार्दिक व कृणालनं ज्या सोसायटीत घर खरेदी केलं आहे, तिथे दिशा पटानी व टायगर श्रॉफ यांचाही फ्लॅट आहे.

हार्दिक आणि कृणाल मध्यमवर्गीय कुटुंबातून स्वतःच्या मेहनतीवर इथवर पोहोचले आहेत. वडोदरा येथे एका लहानशा अपार्टमेंटमध्ये ते रहायचे.

Read in English