IPL 2022 : बड्डे लोक, बड्डे शौक!; Shreyas Iyer पासून ते विराट, रोहित पर्यंत क्रिकेटपटूंचे 'विचित्र छंद' तुम्हाला थक्क करतील!

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मागील आयपीएलच्या तुलनेत यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या दोन आठवड्यांची व्ह्युअर्सशीप २८ टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. असे असले तरी क्रिकेटपटूंच्या फॅन फॉलोअर्सची संख्या वाढतेच आहे. श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स लाखोंच्या संख्येत आहेत. या स्टार खेळाडूंचे काही विचित्र छंद आहेत, ते आज आपण माहीत करून घेऊयात...

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्याकडे महागड्या बूटांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे Nike x Off White to Air Jordans, Air Max, and Yeezys आदी कंपन्यांचे ब्रँडेड स्नीकर्स आहेत. प्रवासासाठी, जिमसाठी, NBA खेळण्यासाठी अशा प्रत्येक प्रसंगासाठी त्याच्याकडे वेगवेगळे स्नीकर्स आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याकडे महागडे घड्याळं आहेत. Rolex Daytona Rainbow Everose Gold हे ८७ लाखांचं घड्याळ त्याच्या मनगटावर असते. त्याशिवाय त्याच्याकडे Patek Philippe Nautilus, Rolex Datejust, and Rolex Skydweller हे ब्रँडेड घड्याळंही आहेत.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याने BMW M5, Toyota Fortuner, Mercedes GLS 350d, BMW M5, Lamborghini Urus आणि BMW X3 या गाड्या आहेत.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या हा स्टायलिश राहतो आणि त्याच्याकडे महागड्या गाड्यांसोबत महागडी घड्याळही आहेत. त्याच्याकडे Mercedes G63 AMG आणि Range Rover या गाड्या आहेत, तर Rolex Oyster Perpetual Daytona Cosmograph हे जवळपास १ कोटींचं घड्याळही आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक सध्या भलत्याच फॉर्मात आहे. त्याने बांधकाम क्षेत्रात गुंतवणुक केली आहे. चेन्नईतील घराच्या interior साठी त्याने १ कोटी खर्च केले आहेत. त्याशिवाय त्याच्याकडे Porsche Cayman S ही ९० लाखांची गाडीही आहे.