Prithvi Shaw IPL 2022 : धक्कादायक!; दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर पृथ्वी शॉ हॉस्पिटलमध्ये दाखल, जाणून घ्या कारण

Prithvi Shaw admitted to hospital : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) मागे सारे विघ्न लागले आहेत, असेच चित्र दिसत आहे.

Prithvi Shaw admitted to hospital : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) मागे सारे विघ्न लागले आहेत, असेच चित्र दिसत आहे.

आज चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीपूर्वी संघातील नेट बॉलरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि खेळाडूंना क्वारंटाईन व्हावे लागले. सुदैवाने अन्य खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आजचा सामना होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेला हा ८वा खेळाडू ठरला. याआधी मिचेल मार्श व टीम सेईफर्ट या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनी कोरोनावर मात केली. त्यात आता दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. DCच्या सलामीवीराने स्वतः इंस्टाग्राम पोस्टवरून ही माहिती दिली आहे.

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने गुरूवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादवर २१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्ली १० गुणांसह पाचव्या क्रमांकवर आहे आणि त्यांचा नेट रन रेट ०.६४१ हा इतरांपेक्षा चांगला आहे.

प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. दोन सामने जिंकून त्यांच्या खात्यात १४ गुण होतील, पण त्यानंतर नेट रन रेटवर त्यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के होईल. दिल्लीला उर्वरित चार लढतीत चेन्नई, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स व मुंबई इंडियन्स यांचा सामना करायचा आहे.

पृथ्वीला मागच्या सामन्यात विश्रांती दिली गेली होती. त्यामागचं कारण सांगण्यात आलेलं नव्हतं. पृथ्वीने यंदाच्या आयपीएलमध्ये ९ सामन्यांत २८.७८च्या सरासरीने २५९ धावा केल्या आहेत.

पृथ्वीने रविवारी इंस्टा स्टोरिवर तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला फोटो पोस्ट केला. ताप आल्यामुळे पृथ्वी मागील सामन्यात खेळला नव्हता आणि त्यावर तो उपचार घेत असल्याची माहिती त्याने दिली. त्याने लवकरच मैदानावर पतरणार असल्याचेही सांगितले.