Faf Du Plessis on Virat Kohli IPL 2022 RR vs RCB : सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विराट कोहलीबाबत कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचे महत्त्वाचे विधान, म्हणाला...

सातत्याने अपयशी ठरणारा विराट कोहली (Virat Kohli) आज सलामीला आला, परंतु खराब फॉर्माने त्याचा पिच्छा काही सोडला नाही. सामन्यानंतर RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस याने विराटबाबत मोठं विधान केलं...

IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : राजस्थान रॉयल्सच्या १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ ११५ धावांवर माघारी परतला. राजस्थाने २९ धावांनी विजय मिळवताना गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. सातत्याने अपयशी ठरणारा विराट कोहली (Virat Kohli) आज सलामीला आला, परंतु खराब फॉर्माने त्याचा पिच्छा काही सोडला नाही. सामन्यानंतर RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस याने विराटबाबत मोठं विधान केलं...

RCB ने मोहम्मद सिराज ( २-३०), जॉश हेजलवूड ( २-१९) व वनिंदू हसरंगा ( २-२३) यांच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर RRला ८ बाद १४४ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. रियान परागने एकाकी झूंज देताना २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. परागने ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. त्याने हर्षल पटेलने टाकलेल्या २०व्या षटकात १८ धावा चोपल्या.

राजस्थान रॉयल्सने पुण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था पार वाईट केली. १४५ धावांचे माफल लक्ष्य पेलवताना RCBच्या दिग्गज फलंदाजांचा घाम निघाला. कुलदीप सेनने ( ४-२०) सलग दोन धक्के देत गेम चेंजर ओव्हर टाकली. प्रसिद्धी कृष्णानेही दुसऱ्याच षटकात विराट कोहलीची ( ९) विकेट घेऊन RRला मोठे यश मिळवून दिले. कृष्णाने २३ धावांत २ बळी टिपले.

आर अश्विनने १७ धावां ३ विकेट्स घेत RCBची मधली फळीच निष्क्रीय केली. युजवेंद्र चहलने प्रसंगावधान राखून दिनेश कार्तिकला रन आऊट करून माघारी पाठवून राजस्थानचा विजयाचा मार्ग सोपा केला. रियान परागने ( Riyan Parag) अर्धशतकासह क्षेत्ररक्षणात ( ४ कॅच) सुरेख योगदान दिले. आयपीएल २०२२मधील सर्वात कमी धावांचा यशस्वी बचाव करण्याचा विक्रम राजस्थानने नावावर केला. या विजयासह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले.

मागील दोन सामन्यांत विराट गोल्डन डकवर बाद झाला आहे. त्याने मागील ८ सामन्यांत १७च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज त्याने सलामीला येण्याचा निर्णय घेतला, पण नशीब रुसलेच आहे. विराटने मागील ९ डावांत ४१*, १२, ५ , ४८, १, १२, ०, ०, ९ अशी कामगिरी केली आहे.

हा मागच्या सामन्यासारखाच होता. जर तुम्ही पहिल्या काही षटकांमध्ये डेकवर जोरदार मारा केला तर त्यापासून वाचणे अवघड आहे. ती संधी गमावणे महागात पडले. टॉप ऑर्डरचा गुंता सोडवायला हवा. सातत्यपूर्ण कामगिरी करणारे फलंदाज अव्वल चार स्थानांमध्ये असायला हवेत आणि त्यात आम्ही सातत्याने अपयशी ठरतोय.

आज आम्ही फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करून पाहिला आणि त्यांनी सकारात्मक खेळ केला. दिग्गज खेळाडूंप्रमाणे विराटही खराब फेजमधून जातो आणि त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. बस एक चांगली खेळी आणि विराटचा फॉर्म परतेल.