IPL 2021: ३०,००० रुपये दिवसाचं भाडं, दुबईतील आलिशान हॉटेलमध्ये थांबलेत CSKचे खेळाडू; पाहा Photo

IPL 2021 Remaining matches : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिला सामना होणार आहे.

मुंबई इंडियन्सचा ताफा आजच दुबईत पोहोचला असून त्यांच्या पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सचा संघही दुबईसाठी दाखल झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार मेहंद्रसिंग धोनी, पत्नी साक्षी व मुलगी जिवा यांच्यासह यूएईत दाखल झाला आहे आणि त्याच्यासोबत संघातील सर्व खेळाडूही आहेत.

सुरेश रैनानं त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. त्यात रैनानं खोलीच्या बालकनीतून समुद्र किनारा दिसत असल्याचा फोटो आहे.

दुबईतील Th8 Palm हा हॉटेलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू थांबले आहेत. या हॉटेलचं भाडं दिवसाला ३० हजार इतके आहे. हॉटेलमध्ये १६२ रुम्स आणि suites आहेत.