Independence Day 2022 : ३ असे क्रिकेटपटू जे भारताकडून खेळले, पण फाळणी झाली तेव्हा त्यांनी पाकिस्तानला निवडले!

Independence Day 2022 : भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष जल्लोषात साजरा करतोय... ७५ वर्षांच्या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमही सुरू आहे आणि त्यात सामान्यपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकाने सहभाग घेतला आहे.

Independence Day 2022 : भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष जल्लोषात साजरा करतोय... ७५ वर्षांच्या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमही सुरू आहे आणि त्यात सामान्यपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकाने सहभाग घेतला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, माजी सलामीवीर गौतम गंभीर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, माजी अष्टपैलू इरफान पठाण व युसूफ पठाण आदींनी या मोहिमेत स्वतः भाग घेऊन इतरांनाही आवाहन केले.

सर्व सेलिब्रेटिंनीही त्यांच्या सोशल मीडियावरील DP वर तिरंगा ठेवला. पण, आज आपण अशा तीन क्रिकेटपटूंबाबत जाणून घेणार आहोत की ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले, परंतु फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानला स्वीकारले.

अब्दुल हफीज कारदार ( Abdul Hafeez Kardar ) - अब्दुल हफीज कारदार यांना पाकिस्तान क्रिकेटचा जनक म्हटले जाते. १९२५ साली लाहौर येथील त्यांचा जन्म आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे ते पहिले कर्णधार. त्यांनी भारताकडून ३ कसोटी सामने आणि पाकिस्तानकडून २३ कसोटी सामने खेळले आहेत. २६ कसोटी सामन्यांत त्यांनी ९२७ धावा व २१ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून त्यांनी पदार्पणाचा सामना हा भारताविरुद्धच खेळला होता. कारदार यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने १९५२ च्या लखनौ कसोटीत भारताला पराभूत केले होते.

आमीर ईलाही ( Amir Elahi ) - भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांकडून खेळणारे आमीर ईलाही हे दुसरे क्रिकेटपटू.. १९४७मध्ये आमीरने भारताकडून एकमेव कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर ते पाकिस्तानकडून ५ कसोटी सामने खेळले. ६ सामन्यांत त्यांनी ७ विकेट्स व ८२ धावा केल्या. स्थानिक क्रिकेटमध्ये ते खूप यशस्वी राहिले आणि बडोदा संघाचे ते प्रमुख खेळाडू होते. त्यांचा लेग ब्रेक खूप फेमस होता,

गुल मोहम्मद ( Gul Mohammad ) - यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२१ सालचा... स्वातंत्र्यापूर्वी भारताकडून ते खेळले होते, परंतु फाळणी झाल्यानंतर ते पाकिस्तानमध्ये गेले. गुल यांनी १९४६ ते १९५२ या कालाधीत भारताकडून ८ कसोटी सामने खेळले. १९५६ मध्ये त्यांनी पाकिस्तानकडून एकमेव कसोटी खेळली. त्यांनी ९ कसोटी २०५ धावा केल्या. रणजी कंरडक स्पर्धेत त्यांनी विजय हजारे यांच्यासोबत केलेली भागीदारी आजही लोकं आठवतात.