IND vs NZ, T20I Series : टीम इंडियाला मिळाला हार्दिक पांड्याचा पर्याय, ट्वेंटी-२० मालिकेतील ५ सकारात्मक गोष्टी!

IND vs NZ, T20I Series : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर रोहित शर्मा व राहुल द्रविड या नव्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच मालिकेत ३-०असा विजय मिळवला.

IND vs NZ, T20I Series : भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर रोहित शर्मा व राहुल द्रविड या नव्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच मालिकेत ३-०असा विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघानं प्रमुख खेळाडूंना विश्रांती देताना नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली. कर्णधार रोहितनं या युवा खेळाडूंना दडपणाशिवाय खेळण्याचा सल्ला दिला आणि त्याचा फायदा संघाला झाला. राहुल द्रविडनं या मालिकेपासून आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे संघातील उणीवा दूर करण्यावर त्यानं भर दिलेला पाहायला मिळाला.

भारतीय संघानं या मालिकेसाठी निवडलेल्या संघातून हार्दिक पांड्याला डच्चू दिला. त्याला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी NCA मध्ये दाखल होण्यास बीसीसीआयनं सांगितले आहे. त्याच्या जागी या मालिकेत वेंकटेश अय्यरला संधी दिली. पहिल्या दोन सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या या खेळाडूकडून गोलंदाजी करून घेतली गेली नाही, पण तिसऱ्या सामन्यात त्यानं गोलंदाजी करताना १२ धावांत १ विकेट घेतली. फलंदाजीतही त्यानं २५ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मानंही या खेळाडूचं कौतुक केलं.

९-१० वर्ष स्थानिक क्रिकेट खेळल्यानंतर अखेर जलदगती गोलंदाज हर्षल पटेल याला टीम इंडियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. आयपीएल २०२१वर गाजवत पर्पल कॅप जिंकणाऱ्या हर्षलनं पदार्पणाच्या सामन्यात दोन विकेट्स घेत मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारही पटकावला. संथ चेंडू टाकून प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकवण्याची कला हर्षलकडे आहे आणि त्याचा वापर तो डेथ ओव्हरमध्ये सुरेख पद्धतीनं करतो. त्यामुळे आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा विचार केल्या, राहुल द्रविड हर्षलचा संघात समावेश नक्की करू शकतो.

भारतीय संघाला तळाच्या फलंदाजांकडून आतापर्यंत साथ मिळत नसल्याची तक्रार होती. पण, दीपक चहर व हर्षल पटेल यांनी तिसऱ्या सामन्यात केलेली फलंदाजी पाहून हा प्रश्न सुटेल असे दिसतेय. हर्षल व दीपकनं १९ चेंडूंत ३९ धाव कुटल्या. आर अश्विन याच्या अनुभवाची जोडही त्याला मिळाल्यास टीम इंडियाची बॅटींग डेप्थ चांगली होऊ शकते.

आर अश्विन व अक्षर पटेल या जोडीनं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमाल केली होती. आता ट्वेंटी-२०तही ही जोडी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरतेय. त्यांनी ३ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या आणि ६ पेक्ष कमी इकॉनॉमी ठेवली.

रोहित शर्मा व राहुल द्रविड यांनी सुरुवातीलाच युवा खेळाडूंना त्यांचे संघातिल स्थान डगमगणार नाही असा विश्वास दिला. त्यामुळे खेळाडूंवरील दडपण निम्म्याहून अधिक आधीच कमी झाले