IND vs NZ, 2nd Test : राहुल द्रविडनं सुरू केलेली 'आनंद वाटण्याची' परंपरा टीम इंडियानं राखली कायम; जाणून वाढेल आदर

IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली.

IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. भारतानं विजयासाठी ठेवलेल्या ५४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवींचा संघ १६७ धावांत तंबूत परतला. दुसऱ्या डावात आर अश्विन व जयंत यादव यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या.

या सामन्यात मयांक अग्रवाल ( १५० व ६२), शुबमन गिल ( ४४ व ४७), अक्षर पटेल ( ५२ व ४१*) चेतेश्वर पुजारा ( ४७), विराट कोहली ( ३६) यांनी दमदार खेळ केला. गोलंदाजीत आर अश्विननं दोन्ही डावांत ८ , अक्षर पटेलनं ४, जयंत यादवनं ५ व मोहम्मद सिराजनं ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर भारतानं कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले.

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतरच्या पहिल्याच मालिकेत भारतानं ट्वेंटी-२०त न्यूझीलंडवर ३-० असा आणि कसोटीत १-० असा विजय मिळवला. द्रविड प्रशिक्षकपदी आल्यावर भारतीय संघात काही सकारात्मक बदलही पाहायला मिळत आहेत.

प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेण्यापूर्वी द्रविडनं सर्व खेळाडूंना स्वतः फोन करून वर्कलोड बाबत विचारणा केली आणि संघातील स्थानाबाबत चिंता करू नका असा विश्वास निर्माण केला. युवा खेळाडूंनाही त्यानं संधी दिली व अपयशी ठरणाऱ्या खेळाडूंसोबत संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास वाढवला.

कानपूर कसोटीत हातचा सामना गमावल्यानंतर राहुल द्रविडनं स्पोर्टिंग खेळपट्टी तयार करणाऱ्या ग्राऊंड्समनला स्वतःच्या खिशातून ३५ हजार रुपये दिले. द्रविडनं ग्राऊंड स्टाफचं कौतुक केलं.

मुंबई कसोटीत १० विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचे न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन द्रविडनं स्वतः कौतुक केलं. यावेळी त्याच्यासोबत विराट कोहली व मोहम्मद सिराजही होते.

आता कानपूर कसोटीतील द्रविडनं ग्राऊंड्समनच्या कामगिरीला दाद देण्याची सुरू केलेली परंपरा टीम इंडियानं मुंबईतही कायम राखली, टीम इंडियानं वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी तयार करणाऱ्या ग्राऊंड्समनला ३५ रुपये दिले.

Read in English