IND vs NZ, 1st Test, KL Rahul ruled out : लोकेश राहुलची कसोटीतून माघार; अजिंक्य रहाणेला मिळणार 'मुंबई'कराचा आधार, जाणून घ्या कशी असेल प्लेइंग इलेव्हन

IND vs NZ, 1st Test, KL Rahul ruled out : कानपूर कसोटी सुरू होण्यास 48 तासांहून कमी कालावधी असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत हे प्रमुख फलंदाज विश्रांतीवर असताना लोकेश राहुललाही ( KL Rahul) दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.

IND vs NZ, 1st Test, KL Rahul ruled out : कानपूर कसोटी सुरू होण्यास 48 तासांहून कमी कालावधी असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत हे प्रमुख फलंदाज विश्रांतीवर असताना लोकेश राहुललाही ( KL Rahul) दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताच्या प्रमुख खेळाडूंनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला, परंतु लोकेश ट्वेंटी-20 मालिकाही खेळला. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात त्यानंही विश्रांती घेतली आणि कसोटी मालिकेत तो सलामीची धुरा सांभाळणार होता.

पण, आज त्यानं सराव सत्रात सहभाग न घेतल्यानं शंकेची पाल चुकचुकली. लोकेश दुखापतीमुळे कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचे बीसीसीआयनं जाहीर केले अन् टीम इंडियाचे टेंशन वाढले. पण, लोकेशच्या जागी बीसीसीआयनं मुंबईकर खेळाडूचा संघात समावेश केलाय आणि कर्णधार अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) पहिल्या सामन्यात मुंबईकराचाच आधार मिळणार आहे.

बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार लोकेश राहुलच्या डाव्या मांडीचे स्नायू ताणले गेले आणि त्यानं कसोटी मालिकेतूनच माघार घेतली. तो आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे. त्याच्या जागी निवड समितीनं सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याची निवड केली आहे.

लोकेशच्या माघारीमुळे मयांक अग्रवाल व शुबमन गिल हे सलामीला खेळतील हे निश्चित झाले आहे. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. यापैकी कुणालाही संधी मिळाल्यास त्याचे ते कसोटी संघातील पदार्पण ठरेल. 25 नोव्हेंबरपासून कानपूर येथे पहिली कसोटी सुरू होईल.

भारताचा सुधारित संघ- अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वृद्धीमान सहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा ( India’s Test squad: Ajinkya Rahane (Captain), Mayank Agarwal, Cheteshwar Pujara (vice-captain), Shubman Gill, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Wriddhiman Saha (wicket-keeper), KS Bharat (wicket-keeper), Ravindra Jadeja, R. Ashwin, Axar Patel, Jayant Yadav, Ishant Sharma, Umesh Yadav, Md. Siraj, Prasidh Krishna)