IND vs NZ, 1st Test Live Updates : अजिंक्य रहाणेनं डाव घोषित करून मोठी चूक केली?; इतिहास न जाणता न्यूझीलंडला आयती संधी दिली

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारतीय संघानं पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा किवींनी सलामीवीर विल यंग ( २) याची विकेट गमावत १ बाद ४ धावा केल्या आहेत. आता अखेरच्या दिवशी विजयासाठी न्यूझीलंडला २८० धावा, तर टीम इंडियाला ९ विकेट्स हव्या आहेत.

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारतीय संघानं पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा किवींनी सलामीवीर विल यंग ( २) याची विकेट गमावत १ बाद ४ धावा केल्या आहेत. आता अखेरच्या दिवशी विजयासाठी न्यूझीलंडला २८० धावा, तर टीम इंडियाला ९ विकेट्स हव्या आहेत.

भारताच्या पहिल्या डावातील ३४५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडला २९६ धावा करता आल्या. भारतानं ४९ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. पण, शुबमन गिल ( १), अजिंक्य रहाणे ( ४), चेतेश्वर पुजारा ( २२), मयांक अग्रवाल ( १७) आणि रवींद्र जडेजा ( ०) हे झटपट माघारी परतल्यानं भारताची अवस्था ५ बाद ५१ अशी झाली होती.

आर अश्विन व श्रेयस अय्यर या जोडीनं खिंड लढवताना संघाच्या खात्यात ५२ धावांची भर घातली. जेमिन्सननं ही जोडी तोडताना अश्विनला ( ३२) बाद केलं. श्रेयस आत्मविश्वासानं खेळला. त्याची घोडदौड टीम साऊदीनं रोखली. श्रेयसनं १२५ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६५ धावा करताना संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.

श्रेयस- अश्विन माघारी परतल्यानंतर आता टीम इंडियाचा डाव गडगडेल असे वाटले, परंतु वृद्धीमान सहा व अक्षर पटेल यांनी किवी गोलंदाजांना झुंजवले. या दोघांनी ८व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीनं ७ बाद १६७ धावांवरून टीम इंडियाला ७ बाद २३४ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारतानं किवींसमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सहा ६१ व अक्षर २८ धावांवर नाबाद राहिले.

न्यूझीलंडची दुसऱ्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या डावातील अर्धशतकवीर विल यंग ( २) पायचीत झाला. त्यानं DRS घेतला असता तर आर अश्विनला ही विकेट मिळाली नसती. अश्विननं या विकेटसह हरभजन सिंगच्या ४१७ विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली.

भारतानं २८०+ धावांची आघाडी घेताना किवींसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. आतापर्यंत भारतात चौथ्या डावात पाहुण्या संघाला २८०+ धावांच्या लक्ष्याचा एकदाही पाठलाग करता आलेला नाही. १९ ८७मध्ये वेस्ट इंडिजनं दिल्ली कसोटीत व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या नेतृत्वाखाली ५ बाद २७६ धावा करून विजय मिळवला होता.

पण, न्यूझीलंडनं कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक ३२४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. त्यांनी १९९३-९४च्या कसोटीत पाकिस्तानविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे ३२४ धावांचा पाठलाग केला होता. २००८-०९मध्ये त्यांनी बांगलादेशविरुद्ध चिट्टगाव कसोटीत ३१७ धावा केल्या होत्या आणि १९८४-८५मध्ये पाकिस्तानविरुद्ध डुनेडीन कसोटीत २७८ धावांचे लक्ष्य पार केले होते.

भारतानं आतापर्यंत एकदाच दुसरा डाव ३०० पेक्षा कमी धावा असताना घोषित करून विजय मिळवला आहे. लॉर्ड्सवर २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. भारतानं कसोटीचा संपूर्ण एक दिवस शिल्लक असताना दुसऱ्या डावात २८३ धावांच्या आघाडीवर डाव घोषित करण्याची ही सर्वात निचांक धावसंख्या आहे. याआधी १९६४मध्ये इंग्लंडविरुद्ध ३१६ धावांचे लक्ष्य ठेवून भारतानं डाव घोषित केला होता.