IND vs ENG : काय झाडी, काय हाटेल..एकदम ओके! भारतीय खेळाडू BCCI चं ऐकेना; रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतरही काही सुधरेना, Photo

India vs England 5th Test : भारत-इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून पाचव्या कसोटीला सुरुवात होणार आहे. पण, त्याआधीच कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने BCCI ची चिंता वाढली आहे.

India vs England 5th Test : भारत-इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून पाचव्या कसोटीला सुरुवात होणार आहे. पण, त्याआधीच कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने BCCI ची चिंता वाढली आहे. कोरोना काळात बायो बबलमध्येच खेळाडूंना रहावे लागले होते, परंतु आयपीएल २०२२नंतर बीसीसीआयने बायो बबल नसेल हे स्पष्ट केले. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेले खेळाडू शॉपिंग करताना व चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसत आहेत.

मात्र, रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयने सावध पवित्रा घेताना खेळाडूंना ताकीद दिली आहे. २५ जूनला रोहितची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर रोहित आता पाच दिवस विलगिकरणार राहणार आहे. ३० जूनला त्याची दोन वेळा RT-PCR चाचणी करण्यात येईल आणि ती निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला खेळता येईल. रोहितच्या जागी कसोटीसाठी बॅक-अप म्हणून मयांक अग्रवालला बोलावण्याचा निर्णय घेतला.

या प्रकारानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना बाहेर फिरू नका आणि जरी गेलात तरी गर्दी व चाहत्यांसोबत सेल्फी टाळा असे सांगितले. तरीही मंगळवारी भारतीय खेळाडू बर्मिंगहॅम येथे पोहोचताच एका रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत.

विराट कोहली, रिषभ पंत, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, शुबमन गिल, श्रेयस अय्यर आदी भारतीय खेळाडू या फोटोमध्ये दिसत आहेत. यावेळी त्यांनी हॉटेल स्टाफसोबत फोटोही काढले.

एकीकडे बीसीसीआयन खेळाडूंना काळजी घेण्यास सांगत असताना हे मात्र बिनधास्त फिरत आहेत.