India vs England 4th test Live : रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांच्यावर संकट ओढावलं; क्षेत्ररक्षणासाठी BCCIनं मैदानावर नाही उतरवलं!

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतीय संघानं चौथ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार खेळानंतर विराट कोहली, रिषभ पंत व शार्दूल ठाकूर यांनी ईंगा दाखवला.

टीम इंडियानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडला इतिहास घडवण्यासाठी १२६ षटकांत हे लक्ष्य पार करायचे आहे, तर भारताला आघाडी घेण्यासाठी दीड दिवसांत दहा विकेट्स घ्यायच्या आहेत. पण, टीम इंडियाला चौथ्या दिवशी दोन मोठे धक्के बसले आहेत.

शतकवीर रोहित शर्मा व अर्धशतकवीर चेतेश्वर पुजारा हे दोघंही मैदानावर क्षेत्ररक्षणाला उतरलेले नाहीत. त्यांच्या ऐवजी मैदानावर सूर्यकुमार यादव आणि मयांक अग्रवाल स्लीपमध्ये उभे राहिलेले दिसत आहेत. बीसीसीआयनंही यामागचं कारण सांगितल आणि ते ऐकून चाहत्यांचं टेंशन वाढलं आहे.

भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्मानं १२७ व लोकेश राहुलन ४६ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर चेतेश्वर पुजारानं ६१ धावा करताना रोहितला तोलामोलाची साथ दिली. विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकापासून वंचित रहावे लागले असले तरी त्याच्या ४४ धावांच्या खेळीनं टीम इंडियाला मजबूती दिली.

चौथ्या दिवशी रिषभ पंत ( ५०) व शार्दूल ठाकूर ( ६०) यांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चेहऱ्यावरील हास्य हिरावून घेतेल. मोईन अलीनं रिषभला बाद करण्याची सोपी संधी गमावल्यानंतर तर इंग्लंडच्या कर्णधार जो रूट यान डोक्यावर हात मारला.

भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडला असला तरी दुसऱ्या डावात त्यांनी ४६६ धावा करून इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताविरुद्ध आतापर्यंत एकही संघाला चौथ्या डावात ३४५+ धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही.

इंग्लंडनं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात केवळ दोन वेळाच ३१६+ धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लिड्स कसोटीत ९ बाद ३६२ धावा केल्या होत्या, तर त्याआधी १९२९साली मेलबर्नवर ७ बाद ३३२ धावा केल्या होत्या.

इंग्लंडमधील कसोटी सामन्यातील भारताची ही तिसऱ्या डावातील दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. १९६७मध्ये भारतानं लिड्स येथे झालेल्या कसोटीत फॉलोऑन स्वीकारल्यानंतर १० बाद ५१० धावा केल्या होत्या आणि भारताला तो सामना गमवावा लागला होता.

दरम्यान, रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्यात दुखापत झालीय, तर पुजाराच्या पायाच्या घोटा दुखावला आहे. त्यामुळे त्यांनी विश्रांती घेतली आहे. ( Rohit Sharma and Cheteshwar Pujara will not take the field. Rohit has discomfort in his left knee while Pujara has pain in his left ankle.)