Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'ने सूर्यकुमार यादवच्या जागी दोन सामन्यांसाठी घेतला Akash Madhwal याला बदली खेळाडू; किती किंमत मोजली पाहा

मुंबईचे यंदाच्या हंगामात केवळ २ सामने शिल्लक

Suryakumar Yadav Akash Madhwal, IPL 2022: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली Mumbai Indians चा यंदाचा हंगाम अतिशय वाईट गेला. आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांपैकी मुंबईच्या संघाने तब्बल ९ सामने गमावत गुणतालिकेत तळ गाठला.

मुंबईच्या चाहत्यांच्या वाट्याला यंदाच्या हंगामात मोजकेच आनंदाचे क्षण आले. तीन सामन्यात जरी त्यांना विजय मिळाला असला तरी रोहित शर्माच्या बॅटमधून मोठी खेळी निघालीच नाही. तशातच सूर्यकुमार यादव दमदार खेळ करत असतानाच दुखापतग्रस्त झाल्याने चाहते हिरमुसले.

सूर्याच्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सचे फार मोठे नुकसान झाले नाही. कारण मुंबईचा संघ ८ पराभव पचवून आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. असे असतानाही आता साखळी फेरीतील उर्वरित दोन सामन्यांसाठी सूर्यकुमारच्या जागी मुंबईने एका नव्या खेळाडूला संघात स्थान दिले आहे.

सूर्यकुमार यादवच्या जागी मुंबई इंडियन्सने आकाश मधवाल (Akash Madhwal) या खेळाडूला चमूत स्थान दिले आहे.

आकाश मधवाल हा मूळचा उत्तराखंडचा असून तो २८ वर्षांचा आहे. त्याच्या गाठीशी १५ टी२० सामन्यांचा अनुभव आहे. तो मध्यमगती गोलंदाज असून त्याने १५ विकेट्स घेतल्या आहेत.

IPL 2022 साठी मुंबईच्या संघाने त्याला २० लाखांच्या मूळ किमतीवर करारबद्ध केला असून तो संघात दाखल झाला आहे.