2 New IPL Teams in 2022 : लखनौ, अहमदाबाद फ्रँचायझींची रिकॉर्डतोड बोली; जाणून घ्या सर्व संघांच्या मुळ किंमती!

New IPL Teams in IPL 2022: संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. Indian Premier League मध्ये ( IPL 2022) आता मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, सनयारझर्स हैदराबाद, किंग्स पंजाब, लखनौ व अहमदाबाद असे दहा संघ खेळणार आहेत. दोन नव्या फ्रँचायझींसाठी १० स्पर्धेत शर्यतीत होते. या नव्या करारानं बीसीसीआयला १२, ६९० कोटींचा फायदा झाला आहे.

RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली. RP संजीव गोएंका यांची एकूण संपत्ती ही ६ बिलियन अमेरिकन डॉलर आणि उत्पन्न ४ बिलियन अमेरिकन डॉलर इतके आहे. हा भारतातील सर्वात जलद वाढणारा समुह आहे. विज व ऊर्जा निर्मितीसह हा समुह कार्बन ब्लॅक उत्पादन, रिटेल, आयटी सेक्टर, FMCG, media, entertainment आणि agriculture या विभागातही गुंतवणुकदार आहे. २०२०मध्ये त्यांनी २६,९०० कोटी महसूल कमावला आहे. या समुहात ५० हजाराहून अधिक कर्मचारी काम करतात, तर कोट्यवधी भागधारक आहेत.

CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत.

चारवेळा आयपीएल जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचे मालकी हक्क इंडिया सिमेंट्सकडे आहेत आणि त्याचे मालक बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवास आहेत. २००८मध्ये त्यांनी ९१ मिलियन डॉलरला म्हणजेच ८२ कोटींत हा संघ खरेदी केला होता, पण आजच्या घडीला त्याचे बाजारमुल्य ४२०० कोटी आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सची मालकी हक्क रिलायन्स कंपनीकडे आहे आणि २००८मध्ये त्यांनी १११.९ मिलियन डॉलर म्हणजेच ८ अरब ३९ कोटींत खरेदी केले होते.

राजस्थान रॉयल्सनं आयपीएलच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद पटकावले होते. इमर्जिंग मीडियानं ६७ मिलियन डॉलरमध्ये म्हणजेच ५ अरब रुपयांत हा संघ खरेदी केलाय.

डाबर, वाडिया ग्रुप, प्रिती झिंटा आणि एपीजे ग्रुप यांनी मिळून पंजाब किंग्सचे मालकी हक्क खरेदी केले आहेत. या संघाची किंमत ७६ मिलियन डॉलर म्हणजेच ७० कोटी इतकी आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे मालकी हक्क युनायडेट स्पिरिट्स यांच्याकडे आहेत. २००८मध्ये हा संघ किंगफिशर कंपनीनं ८ अरब ३७ कोटींत खरेदी केला होता.

डेक्कन चार्जर्स संघाची किंमत ही ८ अरब एवढी होती.

कोच्चि टस्कर्स एकच पर्व खेळला आणि त्याची किंमत २४ अरब ९९ कोटी इतकी होती.

२०१३मध्ये डेक्कन चार्जर्सच्या जागी सनरायझर्स हैदराबाद संघ दाखल झाला आणि त्याची किंमत ६ अरब रुपये एवढी आहे.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची रेड चिलीज कंपनी आणि जय मेहता यांच्याकडे कोलकाता नाइट रायडर्सचे मालकी हक्क आहेत. त्यांनी ७५.१ मिलियन डॉलर म्हणजेच साडेपाच अरब रुपयांत हा संघ खरेदी केला होता.

सुरुवातीला जेएमआर ग्रुपकडे असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे मालकी हक्क आता JSW ग्रुपकडे आहेत आणइ त्यांनी ६ अरब ३० कोटींत हा संघ खरेदी केलाय.

Read in English