यष्टिरक्षकानं सहाव्या वर्षी गमावली करंगळी; नऊ बोटांसह टीम इंडियासाठी केली Keeping!

वयाच्या सहाव्या वर्षी एका अपघातात डाव्या हाताची करंगळी कापली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:39 PM2020-04-27T16:39:50+5:302020-04-27T16:42:31+5:30

whatsapp join usJoin us
Parthiv Patel represented India with 9 fingers after losing one at six svg | यष्टिरक्षकानं सहाव्या वर्षी गमावली करंगळी; नऊ बोटांसह टीम इंडियासाठी केली Keeping!

यष्टिरक्षकानं सहाव्या वर्षी गमावली करंगळी; नऊ बोटांसह टीम इंडियासाठी केली Keeping!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यष्टिरक्षण करणे ही सोपी गोष्ट नाही. दीर्घकाळ यष्टिंमागे उभं राहिल्यानं अनेकांच्या बोटांना दुखापत झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण, दुखापतग्रस्त असूनही पार्थिव पटेल देशासाठी यष्टींमागे उभा राहिला. स्थानिक क्रिकेटमध्ये 193 लिस्ट ए आणि 194 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत प्रतिनिधित्व करणाऱ्या पार्थिव पटेलच्या नावावर 16 हजाराहून अधिक धावा आहेत. पण, पटेल इतकी वर्ष केवळ नऊ बोटांसह खेळत आहे आणि याचा खुलासा त्यानं स्वतः केला. 

Video : युवराज सिंग Right-handed असता तर? स्टुअर्ट ब्रॉडची अशी धुलाई झाली असती

पटेलचे हे गुपित काही मोजक्याच लोकांना माहीत आहे. वयाच्या सहाव्या वर्षी एका अपघातात त्याच्या डाव्या हाताची करंगळी कापली गेली. दरवाजात बोट अडकल्यानं त्याला ते बोट गमवावे लागले होते. पार्थिवने सांगितले की,''मी सहा वर्षांचा असताना डाव्या हाताची करंगळी दरवाज्यात अडकली आणि ती कापली गेली.'' त्यामुळे किपींग करताना हातात ग्लोज फिट बसत नव्हते. नऊ बोटांसह किपींग करताना त्रास व्हायचा, असेही तो म्हणाला. 

त्याने सांगितले की,''विकेट किपींग ग्लोजमध्ये हात फिट बसायचा नाही, कारण डाव्या हाताला केवळ चारच बोटं होती. त्यामुळे मी माझ्या ग्लोजला टेपनं बांधायचो. दहा बोटं असती तर मी नक्कीच आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो, परंतु नऊ बोटांसह मी देशाचे प्रतिनिधित्व केले. याचा मला अभिमान वाटतो.''

पार्थिवनं 2002 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं 25 कसोटी आणि 38 वन डे सामन्यांत अनुक्रमे 934 आणि 736 धावा केल्या आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...

KL Rahulला कथित Ex-Girlfriendनं केलं अनफॉलो? जाणून घ्या सत्य

युवराज सिंगचा मोठा खुलासा;'या' खेळाडूमुळे निवृत्तीचा विचार डोक्यात सुरू झाला!

फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू मागतोय माफी; म्हणतो दुसरी संधी द्या...

आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो!; 'कॉफी विथ करण' वादावर Hardik Pandya म्हणतो...

डेव्हिड वॉर्नरची 'बनवाबनवी'; पत्नीचा स्वीम सूट घालून TikTok Video 

अभिमानास्पद ; शूजवर हातानं लिहायची Adidas; आता तोच ब्रँड Hima Dasसाठी बनवतो 'खास' शूज!

Web Title: Parthiv Patel represented India with 9 fingers after losing one at six svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.