धोनीची उणीव भरुन काढण्याच्या नादात पंतवर आले दडपण, एमएसके प्रसाद

‘स्वत:ला महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी मानून त्याची उणीव भरुन काढण्याच्या प्रयत्नात रिषभ पंत याने स्वत:वर नको ते दडपण ओढवून घेतले,’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:38 AM2019-11-28T04:38:49+5:302019-11-28T04:39:08+5:30

whatsapp join usJoin us
Pant represses in the name of overcoming Dhoni's deficiency - MSK Prasad | धोनीची उणीव भरुन काढण्याच्या नादात पंतवर आले दडपण, एमएसके प्रसाद

धोनीची उणीव भरुन काढण्याच्या नादात पंतवर आले दडपण, एमएसके प्रसाद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली: ‘स्वत:ला महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी मानून त्याची उणीव भरुन काढण्याच्या प्रयत्नात रिषभ पंत याने स्वत:वर नको ते दडपण ओढवून घेतले,’ असे मत राष्टÑीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी बुधवारी व्यक्त केले. खराब कामगिरीचा सामना करीत असलेल्या पंतला सूर गवसण्यासाठी अविश्वसनीय कामगिरी करावीच लागेल, यावर प्रसाद यांनी भर दिला आहे. काही दिवस आधीपर्यंत पंत हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात यष्टिरक्षणात प्रथम पसंती होता. मात्र तो लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला.

अनुभवी रिद्धिमान साहा दुखापतीतून परतल्यानंतर पंतला कसोटी संघातून वगळण्यात आले होते. एकदिवसीय सामन्यातही पंतची बॅट तळपू शकली नव्हती. याशिवाय यष्टिमागील त्याची कामगिरी अत्यंत ढिसाळ ठरली होती. सलामीवीर रोहित शर्मा याला कठीण काळात पंतची बाजू घ्यावी लागली. पत्रकारांना सामोरे जात रोहितने पंतला मोकळे सोडा. त्याला मोकळेपणाने खेळू द्या, असे आवाहन केले होते. सुनील गावसकर यांनी मात्र देशासाठी खेळताना पंतसाठी दडपणाचा सामना करणे क्रमप्राप्त ठरते, असे म्हटले आहे.
प्रसाद म्हणाले, ‘मी रोहित व गावसकर यांच्याशी सहमत आहे. रिषभ सध्या कठीण स्थितीतून वाटचाल करीत असून त्याला चांगली खेळी करण्याची गरज आहे. संघ व्यवस्थापनाशी माझे बोलणे झाले. ते पंतवर मेहनत घेत आहेत. दडपणाबाबत बोलायचे झाल्यास या स्तरावर खेळताना दडपण झेलावेच लागेल, याची जाणीव पंत यालाही असावी. जो दडपण झुगारुन कामगिरी करतो, तोच चॅम्पियन ठरतो. त्याच्यापुढे विराट आणि रोहितसारख्या दिग्गजांचे उदहारण आहे.’ (वृत्तसंस्था)

पंतने कधीही धोनीचा उत्तराधिकारी बनण्याचा प्रयत्न करू नये. पंतची स्वत:ची वेगळी ओळख आहे. धोनीशी तुलना करणे त्याच्या हिताचे ठरणार नाही. धोनीने जवळपास १५ वर्षे आंतरराष्टÑीय स्तरावर घालवली. त्याच्यातील आत्मविशास स्थानिक आणि आंतरराष्टÑीय सामने खेळून उंचावला, हे पंतने ध्यानात घ्यायला हवे.
- एमएसके प्रसाद

भारतासाठी ६ कसोटी आणि १७ एकदिवसीय सामने खेळणारे ४४ वर्षांचे माजी यष्टिरक्षक प्रसाद म्हणाले, ‘कुणी खेळाडू एखाद्या महान खेळाडूशी स्वत:ची तुलना करतो तेव्हा तो स्वत:वर अनावश्यक दडपण आणतो, असे समजा. वैयक्तिकरीत्या मी इतकेच सांगेन की पंतमध्ये प्रतिभेची उणीव नाही, मात्र त्यासाठी त्याने स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवायलाच हवा.’

Web Title: Pant represses in the name of overcoming Dhoni's deficiency - MSK Prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.