Devdutt Padikkal Catch Video, IPL 2022 CSK vs RR : Out की Not Out .... रायडूच्या बॅटिंगच्या वेळी पडिक्कलने पकडलेला कॅच पाहून तुम्हीच ठरवा

रायडू खेळत असताना सहाव्या अवघ्या चेंडूवर घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 10:11 PM2022-05-20T22:11:27+5:302022-05-20T22:13:50+5:30

whatsapp join usJoin us
Out or Not Out see video Devdutt Padikkal sharp low catch to dismiss Ambati Rayudu IPL 2022 CSK vs RR | Devdutt Padikkal Catch Video, IPL 2022 CSK vs RR : Out की Not Out .... रायडूच्या बॅटिंगच्या वेळी पडिक्कलने पकडलेला कॅच पाहून तुम्हीच ठरवा

Devdutt Padikkal Catch Video, IPL 2022 CSK vs RR : Out की Not Out .... रायडूच्या बॅटिंगच्या वेळी पडिक्कलने पकडलेला कॅच पाहून तुम्हीच ठरवा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Devdutt Padikkal Catch Video, IPL 2022 CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या शेवटच्या साखळी सामन्यात अष्टपैलू मोईन अलीने धडाकेबाज ९३ धावांची खेळी केली. CSK ने २० षटकांत १५० धावा केल्या. ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, जगदीशन, अंबाती रायडू या महत्त्वाच्या फलंदाजांनी निराशा केली. पण मोईन अलीने तुफान फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या डावात अंबाती रायडूची विकेट चर्चेचा विषय ठरला.

चेन्नईच्या पहिल्या तीन षटकांत केवळ १५ धावाच झाल्या होत्या. त्यानंतर मोईन अलीने चौथ्या षटकात डावाचा ताबा घेत फटकेबाजी केली. त्याला इतर खेळाडूंची साथ मिळेल अशी अपेक्षा होती. अंबाती रायडू फलंदाजीसाठी आला. त्याने ५ चेंडूत ३ धावा केल्या, पण सहाव्या चेंडूवर त्याच्या बॅटला कट लागून चेंडू स्लीपच्या फिल्डरकडे गेला. त्याने टिपलेला कॅच पाहून फलंदाज नक्की बाद की नाबाद यावर चर्चा पाहायला मिळाली.

पाहा अंबाती रायडूची विकेट, पाहा Video-

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेड मॅकॉय

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायडू, एन जगदीसन, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथीशा पाथिराना, मुकेश चौधरी

Web Title: Out or Not Out see video Devdutt Padikkal sharp low catch to dismiss Ambati Rayudu IPL 2022 CSK vs RR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.