Womens T20 Challenge Final SNO vs VEL : IPL 2022 विजेत्याला २० कोटी, पण महिला विजेत्या संघाला मिळालेली रक्कम पाहून तुम्हालाही येईल राग!

Womens T20 Challenge Final SUPERNOVAS vs VELOCITY : सुपरनोव्हाजने तिसऱ्यांचा महिला ट्वेंटी-२० लीग चॅलेंज स्पर्धेचे जेतेपद उंचावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:49 PM2022-05-28T23:49:46+5:302022-05-28T23:50:12+5:30

whatsapp join usJoin us
Womens T20 Challenge Final SNO vs VEL : INR 25 Lakhs awarded to the Winners of Women's T20 Challenger 2022 - Supernovas, see comparison with IPL 2022 winners price money  | Womens T20 Challenge Final SNO vs VEL : IPL 2022 विजेत्याला २० कोटी, पण महिला विजेत्या संघाला मिळालेली रक्कम पाहून तुम्हालाही येईल राग!

Womens T20 Challenge Final SNO vs VEL : IPL 2022 विजेत्याला २० कोटी, पण महिला विजेत्या संघाला मिळालेली रक्कम पाहून तुम्हालाही येईल राग!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Womens T20 Challenge Final SUPERNOVAS vs VELOCITY : सुपरनोव्हाजने तिसऱ्यांचा महिला ट्वेंटी-२० लीग चॅलेंज स्पर्धेचे जेतेपद उंचावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सुपरनोव्हाजने थरारक लढतीत व्हेलॉसिटीवर ४ धावांनी विजय मिळवला. १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीचा निम्मा संघ ६४ धावांत माघारी परतला होता. सुपरनोव्हाज संघाचा विजय निश्चित मानला जात होता. पण, व्हेलॉसिटिच्या लॉरा वोलव्हार्ड ( Laura Wolvaardt) आणि सिमरन बहादूर ( Simran Bahadur) यांनी अखेरच्या षटकापर्यंत सामना नेला. पण, त्यांना विजयापासून ४ धाव दूर रहावे लागले. 


डिएंड्रा डॉटिनच्या ( Deandra Dottin ) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सुपरनोव्हाजने तिसरे जेतेपद नावावर केले. डॉटिनने ६२ धावा चोपल्या आणि नंतर दोन विकेट्सही घेतल्या. हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) व अलाना किंग (Alana King) यांनीही आजच्या विजयात मोठा वाटा उचलला. प्रिया पुनिया ( २८)  व डॉटिन यांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली.  डॉटीनने त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतसह ३६ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. डॉटिन ४४ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर त्रिफळाचीत झाली. हरमनप्रीत २९ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४३ धावा करुन बाद झाली. सुपरनोव्हाजने ७ बाद १६५ धावा कुटल्या. 

प्रत्युत्तरात व्हेलॉसिटीची सुरूवात खराब झाली आणि त्यांचा निम्मा संघ ६४ धावांत माघारी परतला. शेफाली वर्मा ( १५) व यास्तिका भाटीया ( १३) यांनी आक्रमक सुरुवात केली खरी, परंतु त्यांना मोठी खेळी करता आली नाही. स्नेह राणा व लॉरा वोलव्हार्ड यांची ४० धावांची भागीदारी अलाना किंगने संपुष्टात आणली. वोलव्हार्डने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि पदार्पणाच्या स्पर्धेतील तिचे हे दुसरे अर्धशतक ठरले. वोलव्हार्ड आणि सिमरन बहादूर यांनी अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. त्यांनी यांनी १९ चेंडूंत नाबाद ४४ धावांची भागीदारी केली. १ चेंडूत ६ धावा हव्या असताना एकलेस्टनने सुरेख चेंडू टाकला आणि सिमरनला १ धावेवर समाधान मानण्यास भाग पाडले. व्हेलॉसिटीला १६१ धावाच करता आल्या. 

आयपीएल २०२२ ची बक्षीस रक्कम - विजेता संघ - २० कोटी, उपविजेता -  १३ कोटी, तिसरा क्रमांक - ७ कोटी, चौथा क्रमांक - ६.५ कोटी अन् महिला ट्वेंटी-२० लीग जिंकणाऱ्या सुपरनोव्हाज संघाला BCCI ने २५ लाखांचा धनादेश दिला. 
 

Web Title: Womens T20 Challenge Final SNO vs VEL : INR 25 Lakhs awarded to the Winners of Women's T20 Challenger 2022 - Supernovas, see comparison with IPL 2022 winners price money 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.