Gautam Gambhir Harshit Rana, IND vs SA 1st ODI: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वनडेत १७ धावांनी विजय मिळवला. सामन्यात युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने तीन महत्त्वाचे बळी घेत चांगली कामगिरी केली. आपल्या पहिल्याच षटकात त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण गेल्या काही महिन्यांपासून गौतम गंभीरहर्षित राणाला सातत्याने संधी देत असल्याच्या मुद्द्यावर चर्चा रंगल्या आहेत. तशातच आता एका व्हायरल व्हिडीओमध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे.
या प्रश्नाचे उत्तर वेगवान गोलंदाज संदीप शर्माच्या एक महिन्यापूर्वीच्या पॉडकास्ट क्लिपमध्ये मिळाले आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या पॉडकास्टमध्ये संदीप शर्माने स्पष्ट केले आहे, "राणाची निवड कोणत्याही 'भावनिक' कारणाने झालेली नसून विचारपूर्वक आणि दूरदृष्टीच्या आधारावर करण्यात आली आहे. जेव्हा एखाद्या गोलंदाजाचे कौशल्य दिसते, तेव्हा त्याला परिपक्व होण्यासाठी पुरेसा वेळ दिला जायला हवा. हर्षितच्या बाबतीत हेच झाले आहे. तो ताशी १४० किमी वेगाने गोलंदाजी करतो, त्याची उंची चांगली आहे आणि शरीरयष्टी मजबूत आहे. त्यामुळे तुम्ही त्याला दोन-तीन नीट ट्रेन केलेत, तर तो उत्कृष्ट गोलंदाज बनू शकतो. हाच विचार सध्या केला जात आहे."
"वेगवान गोलंदाजांना विकसित करणे ही नेहमीच एक जोखीम असते. पण निवडकर्ते ती जोखीम उचलतात. याचे कारण असे की, त्यांनी निवड केलेल्या पाच वेगवान गोलंदाजांपैकी केवळ एक किंवा दोनच वेगवान गोलंदाज यशस्वी होताना दिसतात. इतर गोलंदाजाबाबत अंदाज चुकतात. अशा वेळी कोच किंवा निवडकर्त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो," असेही संदीप शर्माने स्पष्टपणे सांगितल्याचे त्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते.
दरम्यान, रांचीतील दमदार कामगिरीनंतर हर्षित राणाचे कर्णधार केएल राहुलनेही कौतुक केले होते आणि सांगितले होते की, संघाला ज्या प्रकारच्या गोलंदाजाची गरज होती, तो हाच गोलंदाज आहे. मात्र, या सामन्यापूर्वी अनेकदा हर्षितची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. अशा वेळी त्याच्यावर टीकाही झाली होती. माजी सलामीवीर कृष्णामचारी श्रीकांत यांनी राणावर टीका करताना त्याला गौतम गंभीरचा "खास माणूस" (Yes Man) म्हटले होते. त्यावर गंभीरनेही तीव्र प्रतिक्रिया दिली होती आणि केवळ क्षमतेच्या आधारावर त्याची निवड झाल्याचे स्पष्ट केले होते.
Web Summary : Sandeep Sharma's podcast reveals Harshit Rana's selection is based on skill and potential, not favoritism. Rana's pace, height, and build make him a promising bowler worth investing in, despite criticism after some poor performances.
Web Summary : संदीप शर्मा के पॉडकास्ट से पता चला कि हर्षित राणा का चयन कौशल और क्षमता पर आधारित है, न कि भाई-भतीजावाद पर। राणा की गति, ऊंचाई और शारीरिक बनावट उन्हें एक होनहार गेंदबाज बनाती है, जिन पर निवेश करना सार्थक है।