टी-२० तील ‘व्हाईटवॉश’; सर्वाधिक वेळा तीन वेळा गमाविण्याची नामुष्की वेस्ट इंडिज संघावर

पाकिस्तान संघ अव्वल स्थानावर असून, पाकने तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत पाचवेळा क्लीन स्वीप केले आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 01:12 PM2021-11-23T13:12:21+5:302021-11-23T13:15:01+5:30

whatsapp join usJoin us
'Whitewash' in T20; The West Indies lost three times the most | टी-२० तील ‘व्हाईटवॉश’; सर्वाधिक वेळा तीन वेळा गमाविण्याची नामुष्की वेस्ट इंडिज संघावर

टी-२० तील ‘व्हाईटवॉश’; सर्वाधिक वेळा तीन वेळा गमाविण्याची नामुष्की वेस्ट इंडिज संघावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताने रविवारी ईडन गार्डनवर न्यूझीलंडला धूळ चारून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ‘व्हाईटवॉश’ केला. या प्रकारात भारताने ही किमया चौथ्यांदा साधली आहे. याबाबत पाकिस्तान संघ अव्वल स्थानावर असून, पाकने तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत पाचवेळा क्लीन स्वीप केले आहे. 

अफगाणिस्तानने तीनदा क्लीन स्वीप केले. तीन सामन्यांची द्विपक्षीय मालिका सर्वाधिक वेळा तीन वेळा गमाविण्याची नामुष्की वेस्ट इंडिज संघावर आली. या संघाने २०१६ला दुसऱ्यांदा या प्रकारात विश्विजेते होण्याचा मान मिळविल्यानंतर तीनदा व्हाइटवॉशची नामुष्की पत्करली आहे. ऑस्ट्रेलिया, बांगला देश, आयर्लंड आणि श्रीलंका या संघांचा दोनदा व्हाइटवॉश झाला.

भारताचे विजय...

विरुद्ध ऑस्ट्रेलिया भारताने २०१६ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या सामन्यात  ऑस्ट्रेलियापुढे १८८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युतरादाखल ऑस्ट्रेलिया १५१ धावांतच गारद झाला. दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १८४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया पुन्हा धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरला. त्यांना १५७ धावाच करता आल्या. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या १९७ धावांचा यशस्वी पाठलाग करीत भारताने ३-० ने मालिका जिंकली.

विरुद्ध श्रीलंका २०१७ साली श्रीलंकेलाही क्लीन स्पीप दिला. पहिल्या सामन्यात भारताने ३ बाद १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर   श्रीलंकेला केवळ ८७ धावांत  गुंडाळले. दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करीत तब्बल २६० धावांचा डोंगरच उभारला. श्रीलंकेला १७२ धावात रोखले. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने दिलेले १३५ धावांचे लक्ष्य सहज पार केले.

विरुद्ध वेस्ट इंडीज भारताने २०१८ ला टी-२० विश्वविजेत्या वेस्ट इंडीजला रिकाम्या हातानेच मायदेशी पाठवले होते. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेले ११० धावांचे लक्ष्य सहज पार केले. दुसऱ्या सामन्यात भारताने  १९५ धावा उभारल्यानंतर विंडीजला १२४ धावात रोखले.  तिसरा सामना अटीतटीचा झाला. वेस्ट इंडीजने भारतापुढे १८२ धावांचे लक्ष्य  ठेवले. भारताने २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य गाठले होते.

(ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, यूएई, वेस्ट इंडीज यांनी प्रत्येकी एकदा क्लीन स्वीप केले आहे.)

तीन सामन्यांच्या मालिकेत  भारताने दिलेले व्हाईटवॉश

प्रतिस्पर्धी       वर्ष                 स्थान     निकाल
ऑस्ट्रेलिया     जानेवारी २०१६     ऑस्ट्रेलिया      ३-०
श्रीलंका        डिसेंबर २०१७        भारत           ३-०
वेस्ट इंडीज      नोव्हेंबर २०१८       भारत          ३-०
न्यूझीलंड     नोव्हेंबर २०२१       भारत        ३-०

Web Title: 'Whitewash' in T20; The West Indies lost three times the most

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.