West Indies crushed England : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला, ४.५ षटकांत इंग्लंडवर १० विकेट्स राखून विजय मिळवला

West Indies crushed England by 10 wickets - वेस्ट इंडिजने रविवारी ऐतिहासिक कामगिरी करताना इंग्लंडवर दणदणीत विजयाची नोंद केली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 10:32 PM2022-03-27T22:32:23+5:302022-03-27T22:32:55+5:30

whatsapp join usJoin us
West Indies crushed England by 10 wickets in the third and final cricket Test on Sunday to win the series 1-0 | West Indies crushed England : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला, ४.५ षटकांत इंग्लंडवर १० विकेट्स राखून विजय मिळवला

West Indies crushed England : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला, ४.५ षटकांत इंग्लंडवर १० विकेट्स राखून विजय मिळवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

West Indies crushed England by 10 wickets - वेस्ट इंडिजने रविवारी ऐतिहासिक कामगिरी करताना इंग्लंडवर दणदणीत विजयाची नोंद केली. वेस्ट इंडिजने ४.५ षटकांत तिसरी व अखेरची कसोटी जिंकून मालिका १-० अशी खिशात घातली. इंग्लंडचे २८ धावांचे लक्ष्य विंडीजने १० विकेट्स राखून सहज पार केले. कर्णधार क्रेग ब्रेथवेट २० आणि जॉन कॅम्बेल ६ धावांवर नाबाद राहिले.  


चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडच्या ८ बाद १०३ धावा होत्या आणि त्यांच्याकडे १० धावांची आघाडी होती. पण, चौथ्य दिवशी ख्रिस वोक्स ( १९) व जॅक लिच ( ४) यांना केमार रोचने माघारी पाठवले आणि इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांवर गडगडला. कायले मेयर्सने १८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्याने १७ पैकी ९ षटकं निर्धाव टाकली. केमार रोचने दोन विकेट्स घेतल्या.२०१९नंतर घरच्या मैदानावरील विंडीजने प्रथमच कसोटी मालिका जिंकली.  



 

Web Title: West Indies crushed England by 10 wickets in the third and final cricket Test on Sunday to win the series 1-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.