Ind Vs Nz Test : 'ए मुंह से सुपारी निकाल कर बात कर रे बाबा'; जाफरनं घेतली 'त्या' भाऊची फिरकी

Ind Vs NZ Test :  पहिल्या दिवसाचा खेळ सुरू असताना सोशल मीडियावर #KanpurTest हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. पण, हा ट्रेंड कुण्या खेळाडूमुळे नाही, तर सामना पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तिमुळे सुरू झालेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:55 PM2021-11-26T17:55:04+5:302021-11-26T17:55:20+5:30

whatsapp join usJoin us
wasim jaffer posts funny meme with photo of spectator from day 1 of kanpur test | Ind Vs Nz Test : 'ए मुंह से सुपारी निकाल कर बात कर रे बाबा'; जाफरनं घेतली 'त्या' भाऊची फिरकी

Ind Vs Nz Test : 'ए मुंह से सुपारी निकाल कर बात कर रे बाबा'; जाफरनं घेतली 'त्या' भाऊची फिरकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पदार्पणवीर श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांच्या उत्तम खेळीनंतर टीम इंडियानं कानपूर कसोटीमध्ये ३४५ धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुवातीला धक्के दिले, परंतु अय्यर व जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ सुरू असताना सोशल मीडियावर #KanpurTest हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. पण, हा ट्रेंड कुण्या खेळाडूमुळे नाही, तर एका व्यक्तिमुळे सुरू झालेला. भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर यानंही या व्यक्तीची दखल घेत एक त्याची फिरकी घेतली आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. या प्रेक्षकांमधील एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. सामन्या दरम्यान कॅमेरामनची नजर एका व्हिडीओवर गेली आणि ती व्यक्ती सोशल मीडियावर फेमस झाली. थेट प्रक्षेपणादरम्यान स्टेडियममध्ये बसललेली एक व्यक्ती तोंडात गुटखा किंवा सुपारी सारखी काही गोष्ट खात असल्याची चर्चा सोश मीडियावर सुरू आहे. ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यातच ही व्यक्ती खाताखाता फोनवरही बोलताना दिसतेय.


भारतीय संघाचा माजी फलंदाज वसीम जाफर यानं ट्विटरवर या प्रेक्षकाची जबरदस्त फिरकी घेतली. त्यानं या व्यक्तीचा फोटो बॉलिवूड चित्रपटातील एका प्रसिद्ध डायलॉगसोबत जोडला. फिर हेरा फेरी चित्रपटातील बाबूरावच्या कॅरेक्टरशी त्या व्यक्तीचा फोटो लावून त्यानं ट्विटरवर शेअर केला. 'ए मुंह से सुपारी निकाल कर बात कर रे बाबा' असं त्यात लिहिलं आहे. सोशल मीडियावर त्याचं हे ट्वीट फार व्हायरल झालं आहे.

Web Title: wasim jaffer posts funny meme with photo of spectator from day 1 of kanpur test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.