विराट कोहली लवकरच टी-२० मधून निवृत्त होईल; मुश्ताक अहमद याचे विधान

विराट कोहलीच्या या निर्णयामुळे क्रिकेटविश्वामध्ये उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:51 AM2021-11-12T07:51:50+5:302021-11-12T07:52:05+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli to retire from T20 soon; Statement by Mushtaq Ahmed | विराट कोहली लवकरच टी-२० मधून निवृत्त होईल; मुश्ताक अहमद याचे विधान

विराट कोहली लवकरच टी-२० मधून निवृत्त होईल; मुश्ताक अहमद याचे विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इस्लामाबाद : टी-२० प्रकारातले कर्णधारपद सोडल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे क्रिकेटविश्वामध्ये उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. 

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज मुश्ताक अहमद याने याबाबत सांगितले की, ‘भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आता लवकरच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारू शकतो. मात्र, असे झाले तरी तो आयपीएल खेळत राहील.’ मुश्ताक पुढे म्हणाला की, ‘आयपीएलमुळेच टी-२० विश्वचषकात भारताचीची कामगिरी सुमार झाली. जास्त काळ बायोबबलमध्ये राहण्याचा परिणाम भारतीयांवर झाल्याने त्यांची कामगिरी सुमार झाली. पाकिस्तानच्या जिओ न्यूजसोबत संवाद साधताना मुश्ताक अहमदने हे वक्तव्य केले.

Web Title: Virat Kohli to retire from T20 soon; Statement by Mushtaq Ahmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.