Yuvraj Singh : युवराज सिंगने पोस्ट केला त्याच्या बाळाचा फोटो; नॅपी बदलताना दिसला भारताचा स्टार खेळाडू, Video 

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याचे लाखो फॉलोअर्स आहेत... सोशल मीडियावर युवीच्या प्रत्येक पोस्टला लाखोंच्या संख्येने लाईस्क मिळतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 04:49 PM2022-05-10T16:49:48+5:302022-05-10T16:50:16+5:30

whatsapp join usJoin us
Video : Indian Cricketer Yuvraj Singh Shares Glimpses Of Himself Acing Daddy Duties With His Newborn Son  | Yuvraj Singh : युवराज सिंगने पोस्ट केला त्याच्या बाळाचा फोटो; नॅपी बदलताना दिसला भारताचा स्टार खेळाडू, Video 

Yuvraj Singh : युवराज सिंगने पोस्ट केला त्याच्या बाळाचा फोटो; नॅपी बदलताना दिसला भारताचा स्टार खेळाडू, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याचे लाखो फॉलोअर्स आहेत... सोशल मीडियावर युवीच्या प्रत्येक पोस्टला लाखोंच्या संख्येने लाईस्क मिळतात... त्यात जर युवीने त्याच्या बाळाचा फोटो पोस्ट केला असेल तर मग फॉलोर्अस तुटून पडणे साहजिकच आहे. ३० डिसेंबर २०१६ रोजी युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच यांचा विवाह झाला होता. हेजलनं यापूर्वी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. तसंच तिनं बिल्ला आणि बॉडिगार्डसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. परंतु लग्नानंतर हेजर चित्रपटसृष्टीत जास्त अॅक्टिव्ह दिसली नाही. 
 

२५ जानेवारी २०२२ या दिवशी युवी व हेझल यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यानंतर ५ मे रोजी हेझलने मुलाचा फोटो पोस्ट केला होता, परंतु त्यात त्याने मुलाचा चेहरा लपवला होता. Star Wars चे स्टीकर त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि त्यावर "May the 4th be with you." असे लिहिले आहे. 

८ मे रोजी युवीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि यात बाळ दिसत आहे. ३ महिन्यांच्या मुलाची नॅपी बदलताना युवी यात दिसतोय. मातृदिनाचं औचित्य साधून युवीनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

युवराज सिंगची लक्षवेधी कामगिरी : 

  • २००७ मध्ये आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेतील सामन्यात एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम
  •   २००० ते २०१७ या कालावधीत २६ वन-डे सामन्यात सामनावीर
  •   २००५ ते २०११ या कालावधीत सातवेळा मालिकावीर 
  •   २०१३-१७ या कालावधीत सात टी-२० सामन्यात सामनावीर
  •   २०१२ मध्ये भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
  •  २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव.
  • २०११ विश्वकप स्पर्धेत स्पर्धावीर पुरस्काराचा मानकरी.

Web Title: Video : Indian Cricketer Yuvraj Singh Shares Glimpses Of Himself Acing Daddy Duties With His Newborn Son 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.