Dewald Brevis : U19 World Cup स्पर्धेत ‘Baby AB’नं केली कमाल; दक्षिण आफ्रिकेला मिळालाय भविष्याचा 'सुपर स्टार', Video

U19 World Cup 2022, England defeat South Africa -  १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर लीग सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान इंग्लंडच्या ( England U19 Team) संघानं पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 11:14 AM2022-01-27T11:14:49+5:302022-01-27T11:15:42+5:30

whatsapp join usJoin us
U19 World Cup 2022 - Dewald Brevis is the first South Africa batter to have four consecutive 50plus scores in the tournament history, his nicknamed ‘Baby AB’, Video | Dewald Brevis : U19 World Cup स्पर्धेत ‘Baby AB’नं केली कमाल; दक्षिण आफ्रिकेला मिळालाय भविष्याचा 'सुपर स्टार', Video

Dewald Brevis : U19 World Cup स्पर्धेत ‘Baby AB’नं केली कमाल; दक्षिण आफ्रिकेला मिळालाय भविष्याचा 'सुपर स्टार', Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

U19 World Cup 2022, England defeat South Africa -  १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर लीग सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान इंग्लंडच्या ( England U19 Team) संघानं पटकावला. दक्षिण आफ्रिकेवर ( South Africa U19 Team) ६ विकेट्स व ११२ चेंडू राखून इंग्लंडनं विजय मिळवून हा पराक्रम केला. पण, या सामन्यात आफ्रिकेच्या  डेवॅल्ड ब्रेव्हिस ( Dewald Brevis) यानं पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ब्रेव्हिसला 'Baby AB' या टोपणनावानं ओळखले जाते आणि त्यानं इंग्लंडविरुद्ध आणखी एक स्फोटक खेळी करून इतिहास घडवला. त्याचे फटके हे एबी डिव्हिलियर्स (  AB de Villiers) साऱखेच आहेत आणि तो Mr. 360 चा मोठा फॅन आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर २१ धावांवर माघारी परतले असताना ब्रेव्हिसनं डाव सावरला. त्यानं पहिल्या २७ धावांसाठी ४९ चेंडूंचा सामना केला. त्यानंतर त्यानं ८८ चेंडूंत ९ चौकार ४ षटकारांसह ९७ धावांची खेळी साकारली. एबीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ब्रेव्हिसकडे त्याचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर आफ्रिकेनं ४३.४ षटकांत २०९ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या रेहान अहमदनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंडनं हे माफक लक्ष्य ३१.२ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. जेकब बेथेलनं ४२ चेंडूंत १६ चौकार व २ षटकारांसह ८८ धावांची खेळी केली, तर विलियम लक्स्टननं नाबाद ४७ धावा केल्या. 

ब्रेव्हिसची U19 World Cup 2022 मधील कामगिरी

  • ५० धावा ( ७० चेंडू) वि. वेस्ट इंडिज ( सराव सामना) 
  1. ६५ धावा ( ९९ चेंडू) वि. भारत
  2. १०४ धावा ( ११० चेंडू) वि. यूगांडा
  3. ९६ धावा ( १२२ चेंडू) वि. आयर्लंड
  4. ९७ धावा ( ८८ चेंडू) वि. इंग्लंड
  • १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत सलग चार सामन्यांत ५०+ धावा करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला आहे.  भारताच्या शुबमन गिलनं अशी कामगिरी केली होती आणि त्यानंतर आता ब्रेव्हिसनं हा विक्रम केला. या संपूर्ण स्पर्धेत ब्रेव्हिसनं ४ सामन्यांत ९९०.५०च्या सरासरीनं सर्वाधिक ३६२ धावा केल्या आहेत.  त्यात १ शतक व ३ अर्धशतकांचा समावेश आहे.  

Web Title: U19 World Cup 2022 - Dewald Brevis is the first South Africa batter to have four consecutive 50plus scores in the tournament history, his nicknamed ‘Baby AB’, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.