India vs Sri Lanka दुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीला 'Below Average'चा शेरा; ICCच्या निर्णयाचा टीम इंडियाला बसेल का फटका?

India vs Sri Lanka : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पहिल्याच कसोटी मालिकेत श्रीलंकेवर २-० असे निर्भेळ यश मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 04:58 PM2022-03-20T16:58:06+5:302022-03-20T16:58:50+5:30

whatsapp join usJoin us
The ICC has rated Bengaluru pitch for the Pink Ball Test between India and Sri Lanka as 'below average', venue will receive one demerit  | India vs Sri Lanka दुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीला 'Below Average'चा शेरा; ICCच्या निर्णयाचा टीम इंडियाला बसेल का फटका?

India vs Sri Lanka दुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीला 'Below Average'चा शेरा; ICCच्या निर्णयाचा टीम इंडियाला बसेल का फटका?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka : भारतीय संघाने रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळलेल्या पहिल्याच कसोटी मालिकेत श्रीलंकेवर २-० असे निर्भेळ यश मिळवले. बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी ( Pink Ball Test) कसोटी खेळवण्यात आली आणि भारताने २३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचे ४४७ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २०८ धावांवर तंबूत परतला. भारतीय संघाने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ( ICC World Test Championship Standings) सुधारणा केली, परंतु आज ICCने या खेळपट्टीला 'Below Average'चा शेरा दिला. 


सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी पोवलेल्या अहवालावरून आयसीसीने हा शेरा दिला आणि ICC Pitch and Outfield Monitoring Process नुसार खेळपट्टीला एक डीमेरिट गुण ( वजा गुण) देण्यात आले आहे. श्रीनाथ यांनी लिहिले की,''पहिल्या दिवसापासून चेंडू खेळपट्टीवर अनपेक्षित फिरकी घेत होता आणि सत्रानुसार फिरकीला अधिक मदत मिळत गेली. माझ्या मते ही खेळपट्टी फलंदाजी व गोलंदाजी यांच्यातल्या पोषक स्पर्धेसाठी पुरक नव्हती. 

ICC च्या नियमानुसार खेळपट्टीला पाच वजा गुण मिळाल्यास या खेळपट्टीवर १२ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी घातली जाईल. या कसोटीत भारताने WTC गुणताकिते चौथे स्थान पटकावले होते आणि ICCच्या या कारवाईचा त्या क्रमवारीवर काहीच परिणाम होणार नाही.  


 

Web Title: The ICC has rated Bengaluru pitch for the Pink Ball Test between India and Sri Lanka as 'below average', venue will receive one demerit 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.