Team India Squad, T20 WC 2022: T20 World Cup साठी 'या' पठ्ठ्याने BCCI च्या आधीच जाहीर केली भारताची टीम; Rohit Sharma ला केलं कर्णधार

पाहा कोणाला दिली संधी अन् कुणाला वगळलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 02:24 PM2022-05-12T14:24:28+5:302022-05-12T14:26:01+5:30

whatsapp join usJoin us
Team India Squad for T20 world cup declared by Fan in stadium with poster Twitter Users reaction during IPL 2022 DC vs RR | Team India Squad, T20 WC 2022: T20 World Cup साठी 'या' पठ्ठ्याने BCCI च्या आधीच जाहीर केली भारताची टीम; Rohit Sharma ला केलं कर्णधार

Team India Squad, T20 WC 2022: T20 World Cup साठी 'या' पठ्ठ्याने BCCI च्या आधीच जाहीर केली भारताची टीम; Rohit Sharma ला केलं कर्णधार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Squad for T20 World Cup 2022: क्रिकेट चाहत्यांना यंदाच्या वर्षी T20 क्रिकेटचा ट्रिपल धमाका पाहायला मिळणार आहे. सध्या IPL 2022 ची धूम सुरू आहे. यानंतर वर्षाच्या शेवटी T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. तर या दरम्यान आशिया चषकही खेळवला जाणार असल्याची चर्चा असून त्यात भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना रंगणार आहे. गेल्या वर्षी टी२० विश्वचषक झाला होता, त्यात टीम इंडिया साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर फेकली गेली होती. यंदा मात्र भारतीय संघ विजेतेपदाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. चाहत्यांनाही वर्ल्डकपबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. याचदरम्यान, एका चाहत्यांने उत्साहाच्या भरात थेट एका मोठ्या पोस्टरवरच भारताचा १५ खेळाडूंचा टी२० वर्ल्डकपसाठीचा संघ लिहून आणल्याचे दिसले.

दिल्ली आणि राजस्थान यांच्यात बुधवारी IPLचा सामना रंगला. या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात एक चाहता थेट मोठ्या पोस्टरवर विश्वचषकातील भारतीय संघ निवडून त्यांची नावे दाखवताना दिसला. तसेच, जेव्हा त्याच्या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा लोकांनीही ट्विटरवर त्याच्या सिलेक्शनवर कमेंट्स केल्या.

चाहत्याने निवडलेला संघ-रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (किपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, राहुल तेवातिया, रिषभ पंत, प्रसिध कृष्णा

एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'दीपक चहरच्या जागी टी नटराजन, सिराजच्या जागी हर्षल पटेलला संघात घेतलं पाहिजे. हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली पाहिजे. बाकी सगळं ठीक आहे. त्याच वेळी दुसऱ्या युजरने लिहिलं की, रोहित आणि कोहलीला संघातून वगळा. लोकेश राहुलला कर्णधार करता येऊ शकतं. तर एका युजरने सिराजऐवजी आवेश खानला संधी देण्याचाही सल्ला दिला.

Web Title: Team India Squad for T20 world cup declared by Fan in stadium with poster Twitter Users reaction during IPL 2022 DC vs RR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.