T20 World Cup : राहुल चहरला बाकावर बसवून अंडी विकायला लावणार आहात का?; भारतीय संघनिवडीवर माजी फिरकीपटूचा सवाल

T20 World Cup 2021: पाकिस्तानकडून १० विकेट्सनं मात खाणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७ बाद ११० धावाच करता आल्या आणि रवींद्र जडेजा (  नाबाद २६) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:13 PM2021-11-02T17:13:57+5:302021-11-02T17:14:22+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2021: Are You Going To Make Rahul Chahar Sell Eggs From The Bench?: Danish Kaneria Slams Indian Team Management | T20 World Cup : राहुल चहरला बाकावर बसवून अंडी विकायला लावणार आहात का?; भारतीय संघनिवडीवर माजी फिरकीपटूचा सवाल

T20 World Cup : राहुल चहरला बाकावर बसवून अंडी विकायला लावणार आहात का?; भारतीय संघनिवडीवर माजी फिरकीपटूचा सवाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2021: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी आणि संघ निवड हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तानकडून दारूण पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करताना इशान किशन व शार्दूल ठाकूर यांना खेळवले. पण, त्याचवेळी त्यांनी हार्दिक पांड्या व वरुण चक्रवर्थी यांच्यावरील विश्वास कायम ठेवला. या दोघांनाही साजेशी कामगिरी करता आली नाही. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि चक्रवर्थी हे पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्यांची निवड का केली गेली, असा सवालही विचारला जात आहे. त्यात संघात निवडलेल्या राहुल चहरला ( Rahul Chahar) संधी न मिळाल्यानं पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कानेरीया ( Danish Kaneria ) यानं सवाल उपस्थित केला आहे. 

पाकिस्तानकडून १० विकेट्सनं मात खाणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७ बाद ११० धावाच करता आल्या आणि रवींद्र जडेजा (  नाबाद २६) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. जडेजाला साथ म्हणून चक्रवर्थीला संघात खेळवले, परंतु त्याला दोन्ही सामन्यांत एकही विकेट घेता आली नाही. न्यूझीलंडविरुद्ध दोन्ही विकेट्स जसप्रीत बुमराहनं घेतल्या. युझवेंद्र चहलनं आयपीएल २०२१मध्ये फॉर्म मिळवला होता आणि त्याचा विचार केला जाईल अशी अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. कानेरीयानं राहुल चहरला संघात न खेळवण्यावरून आणि युझवेंद्र चहलची निवड न करण्यावरून  संघ व्यवस्थापनाला सवाल केला.

''तुम्ही युझवेंद्र चहलची निवडच केली नाही, राहुल चहरला बाकावर बसवून ठेवलंय. त्याला तुम्ही अंडी विकायला लावणार आहात का? जर तुम्ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या अन्य संघाकडे पाहाल तर वनिंदु हसरंगा, आदील रशिद, राशिद खान, शाबाद खान हे लेग स्पिनर प्रत्येक खेळपट्टीवर चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. इंग्लंडविरुद्ध हसरंगानं तीन विकेट्स घेतल्या, परंतु तुम्ही राहुल चहरला प्रोत्साहन देत नाही आहात, युझवेंद्रलाही संघात निवडायला हवं होतं,''असं कानेरीया म्हणाला.

Web Title: T20 World Cup 2021: Are You Going To Make Rahul Chahar Sell Eggs From The Bench?: Danish Kaneria Slams Indian Team Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.