Syed Mushtaq Ali Trophy : ४ चेंडू ४ विकेट्स; विदर्भच्या दर्शन नळकांडेचा विक्रम; लसिथ मलिंगा, राशिद खान यांच्या पंक्तित पटकावलं स्थान, video

Syed Mushtaq Ali Trophy Semi Final : विदर्भचा गोलंदाज दर्शन नळकांडे (Darshan Nalkande) यानं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 03:33 PM2021-11-20T15:33:53+5:302021-11-20T15:34:39+5:30

whatsapp join usJoin us
Syed Mushtaq Ali Trophy Semi Final : 4 balls 4 wickets! Vidarbha's Darshan Nalkande's sensational bowling show against Karnataka, Video | Syed Mushtaq Ali Trophy : ४ चेंडू ४ विकेट्स; विदर्भच्या दर्शन नळकांडेचा विक्रम; लसिथ मलिंगा, राशिद खान यांच्या पंक्तित पटकावलं स्थान, video

Syed Mushtaq Ali Trophy : ४ चेंडू ४ विकेट्स; विदर्भच्या दर्शन नळकांडेचा विक्रम; लसिथ मलिंगा, राशिद खान यांच्या पंक्तित पटकावलं स्थान, video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Syed Mushtaq Ali Trophy Semi Final : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तामिळनाडूनं विजय मिळवताना सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी हैदराबादवर ८ विकेट्स व ३४ चेंडू राखून सहज विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भचा गोलंदाज दर्शन नळकांडे (Darshan Nalkande) यानं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. कर्नाटकविरुद्धच्या या सामन्यात दर्शननं चार चेंडूंत चार विकेट्स घेताना लसिथ मलिंगा, राशिद खान आदी दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावले.

प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकनं ७ बाद १७६ धावा केल्या. विशेष म्हणजे त्यांच्या चार विकेट्स या अखेरच्या षटकात पडल्या. रोहन कदमनं ५६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ८७, तर कर्णधार मनिष पांडेनं ४२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. अभिनव मनोहरनं २७ धावा केल्या. दर्शननं २०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अनिरुद्ध जोशी ( १),  तिसऱ्या चेंडूवर बीआर शरथ ( ०), चौथ्या चेंडूवर जगदीशा सुचिथ ( ०) व पाचव्या चेंडूवर अभिनव ( २७) याची विकेट घेतली. हे चारही फलंदाज झेलबाद झाले. मुश्ताक अली ट्रॉफीच्या एकाच पर्वात एकाच संघाकडून दोन हॅटट्रिक नोंदवल्या गेल्याची ही पहिलीच वेळ. याआधी अक्षय कार्नेवारनं सिक्किमविरुद्ध  हॅटट्रिक घेतली होती.
मुश्ताक अली ट्रॉफीत चार चेंडूंत चार विकेट्स घेणारा दर्शन हा दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी कर्नाटकच्या अभिमन्यू मिथूननं २०१९च्या उपांत्य फेरीत हरयाणाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. या दोघांनीही २०व्या षटकात हा पराक्रम केला. 


ट्वेंटी-२०त चार चेंडू चार विकेट्स घेणारे गोलंदाज
जिम अॅलेनबी - २००८
आंद्रे रसेल - २०१३
अल-आमीन होसैन - २०१३
राशिद खान - २०१९
लसिथ मलिंगा - २०१९
अभिमन्यू मिथून - २०१९
शाहिन आफ्रिदी- २०२०
कर्टीस  कॅम्फेर - २०२१
दर्शन नळकांडे - २०२१

Web Title: Syed Mushtaq Ali Trophy Semi Final : 4 balls 4 wickets! Vidarbha's Darshan Nalkande's sensational bowling show against Karnataka, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.