WTC Final : ऑस्ट्रेलियानं RCB चॅम्पियनवर लावला डाव; दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये IPL स्टार्सचा भरणा

हे. ११ जूनला रंगणाऱ्या या मेगा फायनलसाठी दोन्ही संघांनी एक दिवस आधीच आपले पत्ते खुले करत प्लेइंग इलेव्हनची घोषणा केल्याचे पाहायला मिळाले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 19:30 IST2025-06-10T19:28:55+5:302025-06-10T19:30:33+5:30

whatsapp join usJoin us
South Africa And Australia Reveal Playing XI For World Test Championship Final | WTC Final : ऑस्ट्रेलियानं RCB चॅम्पियनवर लावला डाव; दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये IPL स्टार्सचा भरणा

WTC Final : ऑस्ट्रेलियानं RCB चॅम्पियनवर लावला डाव; दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये IPL स्टार्सचा भरणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

South Africa And Australia Playing XI for WTC Final : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवण्यात येणार आहे. ११ जूनला रंगणाऱ्या या मेगा फायनलसाठी दोन्ही संघांनी एक दिवस आधीच आपले पत्ते खुले करत प्लेइंग इलेव्हनची घोषणा केल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ऑस्ट्रेलियन संघात RCB ला चॅम्पियन करणाऱ्या गोलंदाजाला संधी

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणाऱ्या दोन्ही संघात आयपीएलमध्ये दिसलेले स्टार खेळाडूंना संधी मिळआली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघातून खेळताना दिसलेला पॅट कमिन्स हा तर ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करतो. त्याच्याशिवाय दिल्लीच्या ताफ्यातून दिसलेला मिचेल स्टार्क आणि RCB च्या संघाला चॅम्पियन करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या जोश हेजलवूड ऑस्ट्रेलियन संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. बोलँड आणि जोश हेजलवूड यांच्यापेकी कुणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार यावर सर्वांच्या नजरा होत्या. ऑस्ट्रेलियाने RCB चॅम्पियनला पसंती देत आपली प्लेइंग इलेव्हन पक्की केलीये.

WTC Final 2025 : कोण उचलणार चांदीची गदा? सामना अनिर्णित राहिला तर काय? जाणून घ्या सविस्तर

MI च्या गड्यासह आफ्रिकेच्या ताफ्यात IPL स्टार्सचा भरणा

 दक्षिण आफ्रिकेनं WTC फायनलसाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एडन मार्करम (LSG), रायन रिकल्टन (MI), कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स (DC), मार्को यान्सेन (PBKS) आणि लुंगी एनिगडी (RCB) हे आयपीएल स्टार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.  मार्करम, रिकल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स या फलंदाजांनी आयपीएलमध्ये धमाकेदार खेळी करुन दाखवलीये. पण त्यांना आता संयमी खेळीसह आपल्या भात्यातील क्लास दाखवून संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे चॅलेंज असेल.


दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन :

टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरीन, मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
 
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन :  

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर,   अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.

Web Title: South Africa And Australia Reveal Playing XI For World Test Championship Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.