shoaib akhtar: "माझ्यासारखी वेगवान गोलंदाजी करायची असेल तर..."; शोएब अख्तरचं अजब विधान!; घेतलं इंग्लंडच्या गोलंदाजाचं नाव

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं २००३ साली इंग्लंडविरुद्ध १६१.३ किमी/तास वेगाने चेंडू फेकून दहशत निर्माण केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 04:21 PM2022-12-08T16:21:34+5:302022-12-08T16:22:59+5:30

whatsapp join usJoin us
shoaib akhtar says mark wood can break his fastest ball record but he needs to pull truck first | shoaib akhtar: "माझ्यासारखी वेगवान गोलंदाजी करायची असेल तर..."; शोएब अख्तरचं अजब विधान!; घेतलं इंग्लंडच्या गोलंदाजाचं नाव

shoaib akhtar: "माझ्यासारखी वेगवान गोलंदाजी करायची असेल तर..."; शोएब अख्तरचं अजब विधान!; घेतलं इंग्लंडच्या गोलंदाजाचं नाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं २००३ साली इंग्लंडविरुद्ध १६१.३ किमी/तास वेगाने चेंडू फेकून दहशत निर्माण केली होती. १०० mph वेगाने चेंडू टाकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला होता. १९ वर्षांपासून शोएब अख्तरचा हा विक्रम आजही कायम आहे. शोएबनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आताही त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. यावेळी शोएब अख्तरनं त्याच्या गोलंदाजीच्या वेगाशी स्पर्धा जगातील कोणता गोलंदाज करू शकतो याची माहिती दिली. इंग्लंडचा गोलंदाज मार्क वुड माझा विक्रम मोडू शकतो असं शोएब म्हणाला पण त्यासाठी त्यानं मार्कला अजब सल्ला देऊ केला आहे. 

शोएब अख्तरनं मार्क वुडच्या गोलंदाजीचं कौतुक तर केलंच, पण आपल्यासारखी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी मार्क वुडला आधी ट्रक खेचावे लागतील, असं विधान केलं आहे. शोएब अख्तरने 'द वॅनी आणि टफर्स क्रिकेट क्लब पॉडकास्ट'मध्ये मार्क वुडचं कौतुक केलं. तो म्हणाला, 'मार्क वुड हा महान खेळाडू आहे, त्याची अॅक्शन चांगली आहे, हाच गोलंदाज मला पाहायला आवडतो'

मार्क वुडनं ट्रक खेचायला सुरुवात करावी
शोएब अख्तरने मार्क वुडला ट्रक ओढण्याचा सल्ला दिला. "मार्क वुड विचार करत असेल की तो ताशी १०० मैल वेगानं गोलंदाजी करू शकत नाही, तर ते चुकीचं आहे. जर त्याला माझ्यासारखी वेगवान गोलंदाजी करायची असेल तर त्याला ट्रक खेचण्यास सुरुवात करावी लागेल. इतका वेगवान चेंडू टाकण्यासाठी मी २६ यार्डांची खेळपट्टी बनवली आणि सरावावेळी चेंडू चारपट जड वापरला. याशिवाय भरपूर वेट ट्रेनिंगही केलं. याच ट्रेनिंगमुळे स्नायू खूप मजबूत झाले", असं शोएब अख्तर म्हणाला. 

अख्तरने वर्ल्ड कप मॅचमध्ये केला होता पराक्रम
शोएब अख्तरने २००३ सालच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध १०० मैल प्रति तासाचा अडथळा पार केला होता. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडूचा सामना इंग्लंडचा फलंदाज मार्कस ट्रेस्कोथिकनं केला होता. इंग्लंडचा मार्क वुड हा सध्याच्या काळातील सर्वात वेगवान गोलंदाज मानला जातो. अलीकडेच, T20 विश्वचषकादरम्यान त्याचा सरासरी वेग १४९ किमी होता. याआधी मार्क वुडनं १५६ किमी. प्रति तासाच्या वेगानं चेंडू टाकला आहे. 

Web Title: shoaib akhtar says mark wood can break his fastest ball record but he needs to pull truck first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.