सचिन तेंडुलकरची पुन्हा फटकेबाजी; भारतीय संघाचे नेतृत्व करताना 'या' लीगमध्ये खेळणार!

अनेक विक्रम नावावर असलेला सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 04:08 PM2022-09-01T16:08:36+5:302022-09-01T16:28:48+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar strikes again; Will play in this league while leading the Indian team! | सचिन तेंडुलकरची पुन्हा फटकेबाजी; भारतीय संघाचे नेतृत्व करताना 'या' लीगमध्ये खेळणार!

सचिन तेंडुलकरची पुन्हा फटकेबाजी; भारतीय संघाचे नेतृत्व करताना 'या' लीगमध्ये खेळणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५०००+ धावा, १०० शतकं आणि १६४ अर्धशतकं... वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला पुरुष फलंदाज... अशी अनेक विक्रम नावावर असलेला सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ( Road Safety World Series ) स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात खेळणार असल्याच्या वृत्ताला तेंडुलकरने दुजोरा दिला आहे. १० सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू  होणार असून २२ दिवस तेंडुलकर क्रिकेटचे मैदान गाजवणार आहे.  इंडियन लीजंड्स ( Indian Legends) संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकर करणार आहे. 

कानपूर येथे लीगचा पहिला सामना होईल, तर रायपूर येथे दोन उपांत्य फेरीचे व अंतिम सामना होणार आहे. १ ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. इंदूर व डेहरादून येथेही या लीगचे काही सामने खेळवण्यात येतील. न्यूझीलंड लीजंड्स ( New Zealand Legends)  हा नवा संघ यंदा लीगमध्ये खेळणार आहे.  भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश व इंग्लंड आदी संघ आधीच्या पर्वात खेलले होते. रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी या लीगचे आयोजन करण्यात आले आहे.  

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि माहिती आणि तंत्रज्ञान आणि युवा व्यवहार मंत्रालय आणि भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने ही लीग खेळवली जात आहे. ''रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ही क्रिकेटच्या माध्यमातून रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती करणारी स्पर्धा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला नियमाची जाण असावी आणि त्यांच्याकडून त्यांचे पालन व्हावे, अशी आमची इच्छा आहे,''असे  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.   

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या Indian Legends संघाने पटकावले होते. 
 

Web Title: Sachin Tendulkar strikes again; Will play in this league while leading the Indian team!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.