आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाला आहे. तो आपल्या बिनधास्त 'बोलंदाजी'सह खास पोस्टमुळे सर्वांच लक्षवेधून घेताना दिसते. आता त्याची बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिच्या फोटोसह शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. आर. अश्विनच्या पोस्टमध्ये ती कशी? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. इथं जाणून घेऊयात नेमकी भानगड काय? त्यामागची खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अश्विनची पोस्ट चर्चेत
आर. अश्विन याने जी पोस्ट शेअर केली आहे त्यात एका बाजूला सनी लिओनीचा स्वोज्वळ रुप आणि दुसऱ्या बाजूला चेन्नईतील संधू स्ट्रीटची झलक पाहायला मिळते. कोणतीही कॅप्शन न देता शेअर केलेल्या फोटोत आर. अश्विन याने फक्त एक इमोजी वापरली आहे. त्यामुळे चाहत्यांना ही काय भानगड? असा काहीसा प्रश्न पडला. काही मीम्सही यावरून सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या.
सनीची झलक अन् व्हायरल पोस्टमागची गोष्ट ![]()
खरंतर, अश्विन यांच्या पोस्टमध्ये एक सिनेमॅटिक हिंट दिसून येते. त्याची ही पोस्ट सनी आणि संधू स्ट्रीटसह IPL च्या मिनी लिलावातील तमिळनाडूच्या अष्टपैलू खेळाडूशी संदर्भातील कनेक्शन दाखवणारी आहे. सनी संधू (Sunny Sandhu) हा तमिळनाडूचा ऑलराउंडर आहे. सनी संधू याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील टी २० पदार्पणात सौराष्ट्रविरुद्ध खेळताना विजयी खेळी साकारली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात संधूने ९ चेंडूत ३० धावा केल्या. साई सुदर्शनच्या साथीनं महत्त्वपूर्ण भागीदारी रचत त्याने तमिळनाडूच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आगामी मिनी लिलावात या खेळाडूवर सर्वांच्या नजरा असतील, हे सांगण्याचा प्रयत्न अश्विन याने हटके अंदाजात केल्याचे दिसून येते.
सनी संधूवर मिनी लिलावात लागू शकते मोठी बोली
अबू धाबी येथे १६ डिसेंबरला होणाऱ्या मिनी लिलावात सनी संधू हा अनकॅप्ड ऑलराउंडरच्या गटात आहे. ३० लाख मूळ किंमत असलेल्या सनीनं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केल्यामुळे मिनी लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळू शकते.