Pushpa Movie Sami Sami Dance, David Warner Video: 'पुष्पा'च्या लोकप्रिय गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा झकास डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

अल्लू अर्जुनने वॉर्नरच्या मुलींच्या डान्स व्हिडीओवर मजेशीर कमेंटही केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 11:58 AM2022-01-24T11:58:23+5:302022-01-24T11:58:31+5:30

whatsapp join usJoin us
Pushpa Movie Rashmika Mandanna Sami Sami Song David Warner Daughters Superb Dance Allu Arjun comments so cute watch Video | Pushpa Movie Sami Sami Dance, David Warner Video: 'पुष्पा'च्या लोकप्रिय गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा झकास डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Pushpa Movie Sami Sami Dance, David Warner Video: 'पुष्पा'च्या लोकप्रिय गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा झकास डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pushpa Movie, David Warner Dance: साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा - द राइज' हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटातील गाण्यांनीही जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलियातही या चित्रपटाच्या गाण्यांची क्रेझ आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी चित्रपटातील एका गाण्यावर डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ स्वत: डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर शेअर केला. डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिले, 'आई आणि वडिलांच्या आधी या मुलींना सामी-सामी गाण्यावर डान्स करायचा होता.' वॉर्नरने पोस्टमध्ये हसणारा एक इमोजीदेखील टाकला.

अल्लू अर्जुनने स्वत: केली कमेंट

डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा डान्स अनेकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटाचा हिरो अल्लू अर्जुन यानेही डेव्हिड वॉर्नरच्या पोस्टवर मजेशीर कमेंट केली. त्याने वॉर्नरच्या पोस्टवर 'Sooo Cute' अशी कमेंट करत दोन इमोजीही टाकले. त्याच पोस्टवर वॉर्नरची पत्नी कँडी हिनेही कमेंट केली. 'मुलींनो, असंच डान्स करत राहा!!', अशी तिने कमेंट केली.

डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. भारतीय चित्रपटांच्या संवाद, गाणी आणि अॅक्शनची तो नेहमीच नक्कल करत असतो. अलीकडेच त्याने पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या एका डायलॉगची छान नक्कल केली होती. यासोबतच त्याने एका गाण्याचीही नक्कल केली होती. अल्लू अर्जुनने त्यावरही कमेंट केली होती.

Web Title: Pushpa Movie Rashmika Mandanna Sami Sami Song David Warner Daughters Superb Dance Allu Arjun comments so cute watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.