T20 World Cup Semi Final पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू मायदेशात न जाता पोहचले दुसऱ्याच देशात; जाणून घ्या कारण 

T20 World Cup Semi Final, Australia beat Pakistan : ग्रुप २ मधील पाचही सामने जिंकून उपांत्य फेरीत धडकणाऱ्या पाकिस्तानला आता कुणीच अडवू शकत नाही, असा दावा त्यांच्या माजी खेळाडूंनी केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 03:19 PM2021-11-13T15:19:47+5:302021-11-13T15:20:28+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan team Arrives in Dhaka for three T20I and two Test match series against Bangladesh which begins on 19 November | T20 World Cup Semi Final पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू मायदेशात न जाता पोहचले दुसऱ्याच देशात; जाणून घ्या कारण 

T20 World Cup Semi Final पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू मायदेशात न जाता पोहचले दुसऱ्याच देशात; जाणून घ्या कारण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Semi Final, Australia beat Pakistan : पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत अडवला. ग्रुप २ मधील पाचही सामने जिंकून उपांत्य फेरीत धडकणाऱ्या पाकिस्तानला आता कुणीच अडवू शकत नाही, असा दावा त्यांच्या माजी खेळाडूंनी केला. पण, ऑस्ट्रेलियानं त्यांची हवा काढली. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियानं ५ विकेट्स व १ षटक हातचे राखून पार केले. डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉयनिस व मॅथ्यू वेड यांनी दमदार खेळ केला.  हसन अलीकडून सुटलेला झेल सामन्यातला टर्निंग पॉईंट ठरला. पाकिस्तानच्या कामगिरीवर त्यांच्या चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात पाकिस्तानी खेळाडू मायदेशात न जाता ढाका येथे पोहोचले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) ही माहिती दिली आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तानचा संघ १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यासाठी शनिवारी ढाका येथे दाखल झाले. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली हा संघ येथे तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी २६ नोव्हेंबरपासून चत्तोग्राम येथे, तर दुसरी कसोटी ४ डिसेंबरपासून ढाका येथे खेळवली जाणार आहे. पण, संघासोबत  कर्णधार बाबर व अनुभवी खेळाडू शोएब मलिक आलेला नाही. ते १६   नोव्हेंबरला ढाका येथे दाखल होतील, असे पीसीबीनं स्पष्ट केलं. बांगलादेश दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील खेळाडूच कायम ठेवले गेले आहेत, अनुभवी खेळाडू मोहम्मद हाफिज यानं PCBकडे विश्रांती मागितली असल्यानं तो मायदेशात गेला आहे.


सेमी फायनलच्या लढतीत काय झालं?
बाबर आजम- मोहम्मद रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या.  रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या.  ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. पण, डेव्हिड वॉर्नर ( David Warner) ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार मारून ४९ धावा चोपल्या.  मॅथ्यू वेड  व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला वेड १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या,तर स्टॉयनिस ४० धावांवर नाबाद राहिला.   

Web Title: Pakistan team Arrives in Dhaka for three T20I and two Test match series against Bangladesh which begins on 19 November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.