NZ vs IND, 1st Test: इशांत शर्मानं टीम इंडियाची लाज राखली; न्यूझीलंडनं घेतली नाममात्र आघाडी

टीम इंडियाच्या 165 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं जोरदार फटकेबाजी केली. केन विलियम्सन आणि रॉस टेलर या अनुभवी जोडीनं किवींना आघाडी मिळवून दिली. पण, हे दोघं माघारी परतल्यानंतर किवींच्या डाव गडगडण्यास सुरुवात झाली. इशांत शर्मानं तीन विकेट्स घेत टीम इंडियाची लाज राखली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 11:44 AM2020-02-22T11:44:46+5:302020-02-22T11:56:49+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand vs India, 1st Test, Day 2: New Zealand lead by 51 runs with 5 wickets in hand in the first innings, Ishant Sharma was the star for India | NZ vs IND, 1st Test: इशांत शर्मानं टीम इंडियाची लाज राखली; न्यूझीलंडनं घेतली नाममात्र आघाडी

NZ vs IND, 1st Test: इशांत शर्मानं टीम इंडियाची लाज राखली; न्यूझीलंडनं घेतली नाममात्र आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देटीम इंडियाचा पहिला डाव 165 धावांवर गडगडलाइशांत शर्माने घेतल्या तीन विकेट्स

भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी : टीम इंडियाच्या 165 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं जोरदार फटकेबाजी केली. केन विलियम्सन आणि रॉस टेलर या अनुभवी जोडीनं किवींना आघाडी मिळवून दिली. पण, हे दोघं माघारी परतल्यानंतर किवींच्या डाव गडगडण्यास सुरुवात झाली. इशांत शर्मानं तीन विकेट्स घेत टीम इंडियाची लाज राखली. 

टीम साऊदी आणि पदार्पणवीर कायले जेमिसन यांनी टीम इंडियाच्या मातब्बर फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखले. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवावा लागला आणि त्यावेळी टीम इंडियाचे 5 शिलेदार 122 धावांवर माघारी परतले होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला, तेव्हा अजिंक्य रहाणेवर भिस्त होती. पण, साऊदीनं टीम इंडियाच्या शिलेदारांना हाराकिरी पत्करण्यास भाग पाडले. भारताचा उर्वरित निम्मा संघ 43 धावांत माघारी परतला. न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पहिला डाव 165 धावांत गुंडाळला.

या माफक धावांचा पाठलाग करताना किवींकडून टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी सावध खेळ केला. पण, 11व्या षटकांत इशांत शर्मानं किवींना पहिला धक्का दिला. त्यानं टॉम लॅथमला ( 11) यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि टॉम ब्लंडल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. पण, पुन्हा एकदा इशांतनं टीम इंडियाला यश मिळवून दिलं. त्याच्या चेंडूंचा अंदाज घेण्यात ब्लंडल अपयशी ठरला आणि 27व्या षटकात किवींना दुसरा धक्का बसला.

रॉस टेलर आणि केन या अनुभवी जोडीनं त्यानंतर किवींना आघाडी मिळवून दिली. रॉसचा हा 100वा कसोटी सामना आहे आणि तो मैदानावर येताच टाळ्यांच्या कडकडाटासह त्याचं स्वागत करण्यात आले. केननं 42व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार खेचून कसोटीतील अर्धशतक पूर्ण केलं. त्याचे हे कसोटीतील 32वे अर्धशतक ठरलं. पुन्हा एकदा इशांतनं भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यानं केन आणि टेलर यांची सेट जोडी तोडली. टेलर आणि केननं तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी करताना संघाला आघाडी मिळवून दिली. पण, इशांतनं 53व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टेलरला बाद केले. टेलरने 71 चेंडूंत 44 धावा केल्या.

रॉस माघारी परतल्यानंतर केननं न्यूझीलंडची घोडदौड सक्षमपणे सांभाळली होती. परंतु, एक चुकीचा फटका आणि त्याला विकेट फेकावी लागली. 63व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर केन झेलबाद झाला. रवींद्र जडेजानं त्याचा झेल टिपला. केननं 153 चेंडूंत 11 चौकारांसह 89 धावा केल्या. केनच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली होती, तरीही तो खेळपट्टीवर ठाण मांडून बसला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. केन आणि रॉस ही अनुभवी जोडी माघारी परतल्यानंतर बीजे वॉटलिंग आणि हेन्री निकोल्स यांच्या खांद्यावर जबाबदारी होती. पण, या जोडीला फार कमाल करता आली नाही. आर अश्विनच्या गोलंदाजीवर हेन्री निकोल्स ( 17) स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या हाती झेल देऊन माघारी परतला. खराब विद्युतप्रकाशामुळे 5 बाद 216 धावांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. 

अजिंक्य रहाणेकडून प्रथमच झालेली 'चूक' टीम इंडियाला महागात पडणार? 

 

 

 

Web Title: New Zealand vs India, 1st Test, Day 2: New Zealand lead by 51 runs with 5 wickets in hand in the first innings, Ishant Sharma was the star for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.