Jhulan Goswami, IND vs AUS, Women's World Cup 2022: नवा सामना नवा विक्रम! टीम इंडियाच्या झुलनचा मैदानात पाय ठेवताच आणखी एक मोठा पराक्रम

झुलनने गेल्या सामन्यात रचला होता २५० बळी घेण्याचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 10:33 AM2022-03-19T10:33:36+5:302022-03-19T10:34:24+5:30

whatsapp join usJoin us
Jhulan Goswami joins Mithali Raj in Elite List Most ODI played India vs Australia womens world Cup 2022 | Jhulan Goswami, IND vs AUS, Women's World Cup 2022: नवा सामना नवा विक्रम! टीम इंडियाच्या झुलनचा मैदानात पाय ठेवताच आणखी एक मोठा पराक्रम

Jhulan Goswami, IND vs AUS, Women's World Cup 2022: नवा सामना नवा विक्रम! टीम इंडियाच्या झुलनचा मैदानात पाय ठेवताच आणखी एक मोठा पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jhulan Goswami, IND vs AUS, Women's World Cup 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असली तरी विक्रमांच्या बाबतीत तिने सातत्य कायम ठेवलं आहे. दररोज ती नवनव्या विक्रमांना गवसणी घालत असून इतिहास रचत आहे. गेल्या वर्ल्ड कप सामन्यात २५० वनडे विकेट्स घेणारी जगातील एकमेव गोलंदाज ठरण्याचा मान तिने मिळवला. त्यानंतर आजच्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातदेखील तिने नवा विक्रम केला. झुलन २०० वनडे खेळणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.

न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रथम फलंदाजी करत ७ बाद २७७ धावा केल्या. कर्णधार मिताली राज (६७), यास्तिका भाटिया (५९) आणि हरमनप्रीत कौर (५७*) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने ही धावसंख्या उभारली. आता भारतीय गोलंदाजांवर संघाची भिस्त आहे. झुलन गोस्वामीसाठी आजचा सामना हा २००वा सामना असल्याने तिच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक वन डे सामने खेळण्याचा विक्रम भारताच्या मिताली राजच्या नावावर आहे. तिने आतापर्यंत २३० सामने खेळले आहेत. सध्याच्या विश्वचषकात मिताली टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. त्यानंतर झुलनचा नंबर लागला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची माजी क्रिकेटपटू शार्लेट एडवर्ड्स ही असून तिने १९१ वन डे सामने खेळले आहेत.

Web Title: Jhulan Goswami joins Mithali Raj in Elite List Most ODI played India vs Australia womens world Cup 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.