Rajasthan Royals In IPL Final: "सारंकाही शेन वॉर्नसाठी...", फायनलमध्ये धडक मारल्यानंतर संजू सॅमसनचं मोठं विधान!

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals In IPL Final) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यानं संघानं आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर जॉस बटलर आणि वेगवान गोलंदाजांचं तोंड भरुन कौतुक केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 06:07 PM2022-05-28T18:07:05+5:302022-05-28T18:08:52+5:30

whatsapp join usJoin us
ipl final 2022 we want to win the ipl for the legendary shane warne says sanju samson | Rajasthan Royals In IPL Final: "सारंकाही शेन वॉर्नसाठी...", फायनलमध्ये धडक मारल्यानंतर संजू सॅमसनचं मोठं विधान!

Rajasthan Royals In IPL Final: "सारंकाही शेन वॉर्नसाठी...", फायनलमध्ये धडक मारल्यानंतर संजू सॅमसनचं मोठं विधान!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुजरात-

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals In IPL Final) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यानं संघानं आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर जॉस बटलर आणि वेगवान गोलंदाजांचं तोंड भरुन कौतुक केलं. राजस्थान रॉयल्सनं दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ७ विकेट्सनं मात दिली. राजस्थानचा सामना आता गुजरात टायटन्सशी होणार आहे. "आयपीएलमध्ये उसळी खेळपट्ट्यांवर खेळण्याचा आमचा सराव चांगला झाला आहे. ही एक दीर्घकालीन स्पर्धा आहे आणि यात अनेक उतार-चढाव येत असतात. वेगवान गोलंदाजांना चांगली साथ या खेळपट्टीवर मिळाली", असं संजू सॅमसन म्हणाला. 

बंगळुरू विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर समालोचकांशी बोलताना संजू सॅमसन आणि जॉस बटलर या दोघांनीही संघाची दमदार कामगिरीसोबतच दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नचाही आवर्जून उल्लेख केला. शेन वॉर्नसाठी संघाला यंदाचं आयपीएलचं विजेतेपद पटकवायचं आहे, असं संजू सॅमसन म्हणाला. शेन वॉर्नच्याच नेतृत्वाखाली आयपीएलच्या पहिल्या वहिल्या पर्वाचं जेतेपद राजस्थान रॉयल्सनं पटकावलं होतं. त्यानंतर १४ वर्षांनंतर राजस्थानचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. 

"यंदाची स्पर्धा शेन वॉर्नसाठीच संघ खेळतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मला वाटतं आता आम्हाला त्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकायचं आहे. वास्तविक पाहता हा खूप मोठा क्षण आहे. मी याबाबत आताच काही जास्त बोलू इच्छित नाही. पण आम्ही फक्त एक पाऊल दूर आहोत आणि शेन वॉर्नसाठी आम्हाला काहीतरी खास करायचं आहे इतकंच सांगू शकतो", असं संजू सॅमसन म्हणाला. 

Web Title: ipl final 2022 we want to win the ipl for the legendary shane warne says sanju samson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.