Mitchell Marsh IPL 2022 RR vs DC Live Updates : १२ चेंडूंत ६२ धावा!; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात मिचेल मार्श ठरला छावा, Playoffsच्या शर्यतीची वाढली चुरस

IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने ( DC) आयपीएल २०२२च्या प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:14 PM2022-05-11T23:14:38+5:302022-05-11T23:14:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 RR vs DC Live Updates : Mitchell Marsh missed out on a fantastic century 89 (62),  Delhi Capitals won by 8 wickets, keeps in the race for the playoffs | Mitchell Marsh IPL 2022 RR vs DC Live Updates : १२ चेंडूंत ६२ धावा!; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात मिचेल मार्श ठरला छावा, Playoffsच्या शर्यतीची वाढली चुरस

Mitchell Marsh IPL 2022 RR vs DC Live Updates : १२ चेंडूंत ६२ धावा!; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात मिचेल मार्श ठरला छावा, Playoffsच्या शर्यतीची वाढली चुरस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने ( DC) आयपीएल २०२२च्या प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे. बुधवारी झालेल्या लढतीत दिल्लीने राजस्थान रॉयल्सवर सहज विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर ( David Warner)  आणि मिचेल मार्श ( Mitchell Marsh) या दोघांनीच RRच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दिल्लीने हा सामना जिंकला आणि १२ गुणांची कमाई केली. मार्शचे शतक थोडक्यात हुकले. 

१६१ धावांच्या लक्ष्याच पाठलाग करताना दिल्लीलाही पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने धक्का दिला. पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत संधी मिळालेला के एस भरत ( KS Bharat) दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर वॉर्नर व मिचेल मार्श यांनी दिल्लीचा डाव सावरला. मार्शही बोल्टच्या गोलंदाजीवर LBW होता, परंतु DRS न घेतल्याने त्याला जीवदान मिळाले. ९व्या षटकातील दुसरा चेंडू वॉर्नरने शॉर्ट बॉस भिरकावला, परंतु सीमारेषेवर देवदत्त पडिक्कल तो जज करण्यात चुकला अन् षटकार मिळाला. पुढच्याच चेंडूवर वॉर्नरने उत्तुंग फटका मारला. यावेळेत जोस बटलरने सर्वस्व पणाला लावले, परंतु त्याच्या हातूनही झेल सुटला. हे कमी होतं की काय  ६वा चेंडू यष्टींना घासून गेला अन् लाल लाईटही पेटली. पण, बेल्स न पडल्याने वॉर्नर नाबाद राहिला. 


आयपीएलच्या ८ पर्वात वॉर्नरने ४००+ धावांचा पल्ला पार करण्याचा पराक्रम केला. यासह त्याने विराट कोहली, शिखर धवन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. सुरेश रैनाने ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. मार्श आज शतक पूर्ण करेल असे वाटत असताना युजवेंद्र चहलने त्याची विकेट घेतली. मार्शला ६२ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ८९ धावांवर माघारी परतावे लागले. वॉर्नर व मार्श यांनी १०१ चेंडूंत १४४ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने दोन खणखणीत षटकार खेचले. विजयासाठी ३ धावांची गरज असताना वॉर्नरने तीन धावा पळून काढल्या आणि अर्धशतकही पूर्ण केले. वॉर्नर ४१ चेंडूंत ५ चौकार व १षटकारासह ५२ धावांवर नाबाद राहिला. रिषभने ४ चेंडूंत नाबाद १३ धावा केल्या. दिल्लीने १८.१ षटकांत २ बाद १६१ धावा करून ८ विकेट्स राखून सामना जिंकला. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरला ( ७) चेतन सकारियाने तिसऱ्याच षटकात माघारी पाठवले.  RRने  आर अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले आणि त्याने यशस्वी जैस्वालसह ४३ धावांची भागीदारी केली. जैस्वाल ( १९) बाद झाल्यानंतर अश्विन व देवदत्त पडिक्कल यांनी फटकेबाजी केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली.  अश्विनने ३७ चेंडूंत आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीत ४ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. पण, पुढच्याच चेंडूवर मार्शने त्याची विकेट घेतली. कर्णधार संजू सॅमसन ( ६) व रियान पराग ( ९) हे झटपट माघारी परतले. पडिक्कलने ३० चेंडूंत ६ चौकार व २ षटकार खेचून ४८ धावा केल्या. राजस्थानला ६ बाद १६० धावा करता आल्या. चेतन सकारिया ( २-२३), मिचेल मार्श ( २-२५) व एनरिच नॉर्खिया ( २-३९) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  (पाहा IPL 2022 - RR vs DC  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

Web Title: IPL 2022 RR vs DC Live Updates : Mitchell Marsh missed out on a fantastic century 89 (62),  Delhi Capitals won by 8 wickets, keeps in the race for the playoffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.