Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : १ धाव घेताच विराट कोहलीने इतिहास घडवला; आयपीएलमध्ये असा विक्रम करणारा पहिलाच ठरला!

विराटने आज पहिली धाव घेतली आणि इतिहास घडला. आयपीएलच्या इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम विराटने आज नावावर केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 09:48 PM2022-05-13T21:48:58+5:302022-05-13T21:57:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : Virat Kohli becomes the first batsman to complete 6,500 runs in IPL history | Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : १ धाव घेताच विराट कोहलीने इतिहास घडवला; आयपीएलमध्ये असा विक्रम करणारा पहिलाच ठरला!

Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : १ धाव घेताच विराट कोहलीने इतिहास घडवला; आयपीएलमध्ये असा विक्रम करणारा पहिलाच ठरला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या २०९ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसकडून फार अपेक्षा आहेत. त्यांच्याकडूनही धडाकेबाज सुरूवात चाहत्यांना पाहायचीय.. पण, विराटने आज पहिली धाव घेतली आणि इतिहास घडला. आयपीएलच्या इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम विराटने आज नावावर केला. 

प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी धडपणाऱ्या पंजाब किंग्सने आज धडाकेबाज कामगिरी केली. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) आणि लिएम लिव्हिंगस्टोननेही ( Liam Livingstone) यांनी अर्धशतक झळकावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB ) समोर तगडे आव्हान उभे केले. हर्षल पटेलने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. वनिंदू हसरंगाने १५ धावांत २ विकेट्स घेत चांगली गोलंदाजी केली. ग्लेन मॅक्सवेल व शाहबाद अहमद यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

बेअरस्टो व धवन यांनी ३.५ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या.  धवन २१ धावांवर माघारी परतला आणि पहिल्या विकेटसाठीची ६० धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पंजाबने पहिल्या सहा षटकांत १ बाद ८३ धावा कुटल्या. पंजाब किंग्सची ही पॉवर प्लेमधील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१४मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांनी १ बाग ८६ धावा केल्या होत्या.  बेअरस्टो २९ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. लिएम लिव्हिंगस्टोन फटकेबाजीच्या मूडमध्ये दिसला आणि त्यामुळे कर्णधार मयांक अग्रवाल सावध खेळ करत होता. अग्रवालसह त्याने ५१  धावांची भागिदारी केली. अग्रवाल ( १९) धावांवर बाद झाला. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७० धावा चोपल्या. पंजाबने ९ बाद २०९ धावा कुटल्या.

या सामन्याआधी विराट कोहलीच्या नावावर २१९ सामन्यांत ३६.३१च्या सरासरीने ६४९९ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ५६६ चौकार व २१४ षटकार खेचले आहेत. त्याच्यानंतर शिखर धवन ६१८६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये ६५०० धावा करणारा विराट हा पहिलाच फलंदाज ठरला. तसेच ट्वेंटी-२०त १०५०० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाजही तोच ठरला. 

Web Title: IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : Virat Kohli becomes the first batsman to complete 6,500 runs in IPL history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.