Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : जे कुणालाच जमले नाही ते विराट कोहलीने करून दाखवले, पाहा विराटच्या ७३ धावांच्या खेळीचा ३.३० मिनिटांचा Video  

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : अखेर विराट कोहलीने ( Virat Kohli) २०२०नंतर आयपीएलमध्ये पहिले मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:01 AM2022-05-20T00:01:16+5:302022-05-20T00:02:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 RCB vs GT Live Updates : Virat Kohli has completed 7,000 runs for RCB in T20 cricket, Watch Virat Kohli dazzles with a stunning 73 (54) in chase Video | Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : जे कुणालाच जमले नाही ते विराट कोहलीने करून दाखवले, पाहा विराटच्या ७३ धावांच्या खेळीचा ३.३० मिनिटांचा Video  

Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : जे कुणालाच जमले नाही ते विराट कोहलीने करून दाखवले, पाहा विराटच्या ७३ धावांच्या खेळीचा ३.३० मिनिटांचा Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : अखेर विराट कोहलीने ( Virat Kohli) २०२०नंतर आयपीएलमध्ये पहिले मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पटकावले. आयपीएल २०२२मध्ये विराटची कामगिरी खूपच खराब सुरू होती आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ( RCB) हा खूप चिंतेचा विषय बनलेला. पण, अखेरच्या साखळी सामन्यात विराटची बॅट तळपली अन् नशिबाचीही त्याला साथ मिळाली. आज विराटने ७३ धावांची मॅच विनिंग खेळी करून RCB ८ विकेट्स राखून जिंकून दिले अन् प्ले ऑफच्या शर्यतीतही कायम राखले. विराटने आज असा विक्रम नोंदवला की जो क्रिकेट इतिहासात कुणी केलेला नाही.. 

वृद्धीमान साहा ( ३१), कर्णधार हार्दिक पांड्या ( ६२*),  डेव्हिड मिलर ( ३४) व राशिद खानच्या ६ चेंडूंत नाबाद १९ धावांच्या जोरावर गुजरातने ५ बाद १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहली व फ‌ॅफ ड्यू प्लेसिस यांनी ११५ धावांची भागीदारी केली. फॅफ ३८ चेंडूंत ५ चौकारांसह ४४ धावांवर बाद झाला. विराट ५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७३ धावांवर स्टम्पिंग झाला. ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४० धावांची नाबाद खेळी करताना सामना १८.४ षटकांत संपवला. RCB ने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला. 

विराटने RCB कडून ७००० धावा पूर्ण केल्या. RCBकडून सर्वाधिक धावांचा विक्रमाचा नवा पल्ला त्याने पार केला. एबी डिव्हिलियर्स ( ४५२२) व ख्रिस गेल ( ३४२०) या विक्रमात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. एका फ्रँचायझीकडून ७०००+ धावा करणारा विराट हा पहिलाच फलंदाज ठरला. शिवाय त्याने आयपीएल इतिहासात धावांचा पाठलाग करताना ३०००+ धावा करण्याचा पहिला मानही पटकावला. एका फ्रँचायझीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत सुरेश रैना ( CSK) ५५२९ धावा व रोहित शर्मा ( MI) ४९८० धावांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.  

आयपीएलमध्ये सर्वाधिक ७०+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने २३ वेळा हा पराक्रम करताना डेव्हिड वॉर्नरचा ( २२) विक्रम मोडला. ख्रिस गेलने २६ वेळा ही कामगिरी केली आहे. विराटचे हे एकूण १४ वे मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार आहे. त्याने गौतम गंभीरला ( १३) मागे टाकले, तर सुरेश रैनाशी बरोबरी केली. या विक्रमात रोहित शर्मा ( १८), महेंद्रसिंग धोनी ( १७)  व युसूफ पठाण ( १६) आघाडीवर आहेत.   

Web Title: IPL 2022 RCB vs GT Live Updates : Virat Kohli has completed 7,000 runs for RCB in T20 cricket, Watch Virat Kohli dazzles with a stunning 73 (54) in chase Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.